आले दाटुनि ढग नभी
वारा ही सुटे बेभान
स्मरे पाऊस पहिला
अशा हळव्या क्षणांत
पहिल्या पावसात त्या
एका छत्रीची सोबत
काही पाऊले चाललो
जणू चाललो खूप वर्ष
एका छत्रीत त्या श्वास
चाले मंद मंद , अन
सोबतीला होता ओल्या
मातीचा सुगंध
ओल्या सरी,खट्याळ वारा
धुंद करिसी तन मना
होई स्पर्श ओझरता
हवाहवासा अन अवघडलेला
पहिल्या पाऊसाची त्या
गोडी भलतीच न्यारी
येता आठव तयाचा
रोम रोम येते शहारु नी
रजनी

12 comments:
पहिल्या प्रेमाची आठवण 😊
पहिल्या प्रेमातलं पहिलेपण आणि पहिल्या पावसातलं पहिलेपण हे जो पावसावर प्रेम करतो त्यालाच कळेल. त्यासाठी मात्र पावसावर मनापासून प्रेम करायला हवे.
Thank you☺️
अगदी खरं आहे सर 😊
खुप छान 👌✍
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
खूप खूप सुरेख 👌👌🌹🌹😊😊
सुंदर रचना!👌👌👌
मस्तच ग पाहिलं प्रेम 👌🏻👌🏻👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
Post a Comment