Monday, 13 July 2020

वाट पहाणं

ठरवलं होतं आयुष्यात
गुंतायचे नाही कुणात

नको ते वाट पाहणं
नको ते जीव लावणं

तुझ्या एका भेटीसाठी
तीळ तीळ झुरणं

पण ठरवल्याप्रमाणे
गोष्टी कश्या घडणार

जीव जडला तुझ्यावर
त्या एका क्षणांत

आता वाटतं,बरं झालं तो क्षण
नाही दवडला
पुढील सर्व सुखद क्षणांचा
बेस नाही हरवला

आता आहे तीळ तीळ झुरणं नि
जीव लावणं पण
हवंहवंसं वाटतंय वाट पाहणं


रजनी



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...