Tuesday, 14 July 2020

तुझे आणि माझे नाते





तुझे आणि माझे नाते

तुझे आणि माझे नाते
शब्दांच्या पलीकडले
भावनांनी ओथंबलेले
जाणिवांनी मोहरलेले

तूझे आणि माझे नाते
काही व्यक्त अन काहीसे अव्यक्त
परि ह्यात गुंतूनही
आपण आहोत अगदी मुक्त

तुझे आणि माझे नाते
काही क्लिअर अन काहीसे धूसर
परि खळखळून वाहे इथे
आपल्या प्रीतीचा सागर

तुझे आणि माझे नाते
कधी गोड तर कधी कटू
कटू क्षणांना विसरून जावू
अन नाते आपुले सदैव फुलवू

रजनी

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...