Monday, 27 July 2020

लग्नाची गोष्ट



लग्नाची गोष्ट नसते
सर्वांची सारखी
काहींची रहाते गोष्ट
तर काही लोकांची होते कहाणी

गोष्ट असते रंजक
काल्पनिक विश्वातली
पण कहाणी मात्र असते
खरी वास्तवातली

गोष्टीचा शेवट खूप वेळा
छानच असतो
पण कहाणी मात्र
सुफळ संपूर्ण करावी लागते

रजनी



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...