
तो आणि ती एक सुंदर जोडप. लग्नाला एक तप पूर्ण करून नात्यात स्थिरावलेल. हे एक तप पूर्ण करता करता हळुहळु वय ही वाढू लागलेल . आता काही नवे नवलाईचे दिवस नाही आयुष्याने बऱ्यापैकी गति पकडलेली अशी अवस्था. संसार आणि या संसारवेलीवर फुललेली दोन गोंडस फुले. त्यांच्याकडे आणि घरातील जेष्ठांकडे बघता बघता तीचे दिवस धावत होते अन या सर्वांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी तो घरापासून लांब राबत होता.
नात्यात प्रेम आणि आदर तर होताच पण काहीतरी कमी आहे अशी जाणिव तीला वारंवार व्हायची कदाचित त्यालाही होत असेल पण या बाबतीत कधी तिने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. इकडे त्याला ही तिच्यातील बदल जाणवत होते पण कसं बोलाव हे त्यालाही कळत नव्हते. त्याच्या नेहमी सोबत नसण्याने तीची कधीकधी होणारी दमछाक त्यात बदलत्या जीवनशैली मुळे आणि वाढणाऱ्या वयामुळे हळुहळु डोक वर काढू लागलेले त्रास सगळे त्याला जाणवत होते.
अशातच एक दिवस नेहमीप्रमाणे तो वीक एंड ला आला. त्याचा मूड बघून ती बोलली "बस झाली धावपळ उद्याचा दिवस जरा आपण दोघेच आपल्या मनाने घालवू या का?" तिचे बोलणे ऐकुन त्याचे डोळे चमकले तो तिचा हात हातात घेऊन बोलला ठीक आहे तर," उद्या चा सगळा दिवस आपण आपल्या मनासारख करु." ती खूप खुश झाली आणि त्याच्या मिठीत शांतपणे झोपूनही गेली.
तो तिला थोपटत विचार करत होता, उद्या नेमक काय करता येईल. विचार करता करता त्याला काही गोष्टी सुचल्या अन तो ही निवांतपणे झोपी गेला. दुसस्या दिवशी तो तिच्या आधी उठला, नंतर तिला हलकेच उठवून तयार व्हायला सांगितले . तिचे मात्र प्रश्नांवर प्रश्न सुर होते, त्याने तिचा हात हातात घेतला त्याच्या त्या स्पशाने ती शांत झाली सांगितल्या प्रमाणे तयार होऊन आली.
तो आवरुन तिची वाट बघत होताच , नंतर दोघे ही कार मध्ये बसले व त्याने कार सुरु केली. तिचे प्रश्न इथे ही सुरुच होते पण त्याने दूर्लक्ष केले. थोड्याच वेळात त्यांची कार एका हॉस्पिटल समोर थांबली. हॉस्पिटल बघताच ती ने परत त्याच्यावर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.
तिला खूर्चीवर बसवून तो आत निघून गेला. तो उत्तर न देता गेला म्हणून मनातल्या मनांत पुटपुटली कुठुन बुद्धी झाली अन ह्याच्याकडे ह्याच्या विश्रांतीचा एक दिवस मागितला,घेऊन नेमक आला तर कुठे इथे हॉस्पीटल मध्ये सकाळपासून साधा चहा सुद्धा दिला नाही. त्याने करायचा तर दूर पण मलाही करु दिला नाही. तीची खूप चिडचिड होऊ लागली.
थोड्याच वेळात तिथे एक नर्स आली व तिला आत घेउन जाऊ लागली, आता मात्र तिला चुप बसवेना ती त्याच्याकडे पाहून बोलली हे काय आहे सांगशील का? एक दिवस मागितला तुला तर हॉस्पिटल दाखवलंस. तिच बोलण ऐकुन त्याने एक मंद स्मित केलं आणि तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पहात राहिला.
त्याचं अस वागण बघून ती अधिकच चिडली अन तिथून जाऊ लागली.
तिला अडवत तो बोलला चाळिसाव्या वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा समज. आज आपण इथे तुझे पूर्ण बॉडी चेकअप साठी आलो आहोत. हे ऐकुन तिचा तिच्या कानांव 'र विश्वासच बसेना. ती पुढे काही बोलणार एवढ्यात तिला अडवत तो बोलला, मला माहित आहे माझी बायको माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे पण ती अजून स्ट्रॉग व्हावी म्हणून मी आज तिला इथे घेऊन आलो आहे.
हे ऐकुन तीला आनंद झाला त्याही पेक्षा जास्त आश्चर्य वाटले आणि त्याच तिच्यावरच प्रेम बघून तिला गहिवरुन पण आलं. "पण हे सर्व तु जमवल कस..?" तो बोलला," काल मला सांगून तू तर लवकर झोपलीस पण मला झोप येईना मग आठवल तू हल्ली सारख डोके दुखीची तक्रार करते , म्हणून मग मी आपले फॅमिली डॉक्टर व माझी एक डॉक्टर मैत्रीण यांना whatsapp केल आणि त्यांच्या मदतीने आज तुझ्यासाठी हे प्लान केल".
मला खात्री होती तुला सांगितल असंत तर तू काही ना काही कारण सांगून टाळल असंत. ह्यावर काय बोलावे हे तिला खरच सुचेनास झाल होत. तिने त्याचा हात हातात घेतला व प्रेमभराने दाबला. त्याने न बोलता नेहमीसारख स्मित केल. तेवढ्यात त्या नर्स च्या परत येण्याने त्यांची समाधी अवस्था भंग पावली व ती त्या नर्स च्या मागे चालू लागली.
रजनी✍️