Tuesday, 29 December 2020

तो नसलेली "मी"


 

तो नसलेली "मी"
वेगळीच भासते
हरवल्यासारखे काहीतरी
शोधत रहाते

तो नसलेली "मी"
अपूर्ण वाटते
तव सोबतीने
पूर्णत्वास येते

तो नसलेली "मी"
पदोपदी अडखळते
तव सोबतीने
अचूक मार्ग क्रमिते

तो नसलेली "मी"
अंधारमय होते
तव सोबतीने
जणू इंद्रधनुष्य फुलते

तो नसलेली "मी"
त्यालाच  शोधत राहते
अन डोक्यावर हात जाता
स्वारी तिथे सापडते
.
.
.
.
.
.
.तो(चष्मा) नसलेली मी
त्यालाच शोधत राहते
अन सापडताच तो
डोळ्यांवर धारण करते😁😁😁😂

रजनी✍️


Friday, 25 December 2020

आणि, मनाचा ताबा सुटला


 

काय सांगू मंडळी
माझ्या वजनाची व्यथा
लिहावयास घ्याल तर
होईल एक कथा

अन्न हे पूर्णब्रम्ह
हीच मिळाली शिकवण
मग जे मिळेल ते खाऊ
हेच ठरवले मिशन

आवडी निवडीची
नव्हती काळजी
पोटही होतं माझं
सोशिक भारी

आंबट-गोड,खारट-तुरट
तिखट नि चमचमीत
चवी चवीने खाऊन
झाले मी टूमटूमीत

रुचकर पदार्थ सेवून मी
द्यायचे तृप्तीचा ढेकर
अन वाढता वाढता वाढू
लागले पोट आणि कंबर

वाढत्या वजनाने माझ्या
पार केली कमाल मर्यादा
आप्तस्वकीयांनीही दिले
मग सल्ले शंभरदा

जड मनाने आणि शरीराने
जॉईन केली व्यायामशाळा
डायट चार्ट बनवून पाळू
लागले खाण्याच्या वेळा

त्या दिवशी व्यायामशाळेत जाताना
तो माझ्या नजरेस पडला
.
.
.
.
.
.
.
.
अन काय सांगू मंडळी
माझ्या मनाचा ताबा सुटला.
..
..
..
..ओळखा पाहू तो कोण
.
.
.
.
.बाहेरून कुरकुरीत आत टम्म फुगलेला
माझा आवडता समोसा😁😁😁🤣🤣



रजनी✍️


Tuesday, 22 December 2020

पाडद्यामागचा बाप


 

पडद्यामागचा बाप
राब राब राबतो
रक्ताचं पाणी करतो
लेकरांचं पोट भरतो

पडद्यामागचा बाप
खूप दुःख सोसतो
लेकरांच्या आनंदात
मनापासून हसतो

पडद्यामागचा बाप
जगणचं विसरतो
लेकरांसाठी मात्र
दीर्घायुष्य मागतो

पडद्यामागचा बाप
पडद्यामागेच राहतो
स्वतः अंधारात राहून
घरदार प्रकाशमान करतो

पडद्यामागच्या बापाला
कधीही विसरू नका
चार घटका निवांतपणे
त्याच्याजवळ बसा

रजनी✍️


पुरुषांच्या मनांतील काहूर


विचारांच वादळं उमटलं
अन प्रश्नाचं काहूर उठलं
अस काय पातक घडलं
म्हणून मला या दोघीत अडकवलं

एकीचा मी बाळं भोळा
तिच्या पोटी जन्मलेला
अन दुसरीचा सौभाग्यटीळा
सात जन्म लाभलेला

आईचा हात धरून
या जगी आलो
बायकोसोबत सप्तपदी चालून
संसारी पुरुष झालो

एकीला वाटे मी
असावे तिच्या ताब्यात
दुसरी म्हणे तो राहील
फक्त माझ्याच कह्यात

दोघींना वाटे मी राहावे
त्यांच्या पदराला धरून
पण मला तर वाटे
जावे दूरवर उडून

प्रश्नांचे काहूर हे
पुन्हा पुन्हा उठतयं
सांगा तुम्हांला तरी
यावर काही उत्तर सापडतयं

रजनी✍️




 

Thursday, 17 December 2020

दिवा(वंशाचा)

 


वंशाच्या दिव्यासाठी
ती वातीसम जळली
अन गलितगात्र होऊन
शेवटी सरणावर चढली
राखेसम जळुन तिने
कर्तव्यपुर्ती केली अन
अहेव मरण लेवून
यमसदनी गेली
थोर आपल्या परंपरेने
तर कमालच केली
निरपराध स्त्री ती
रुढींसाठी बळी गेली😔😔😔


रजनी✍️


Tuesday, 15 December 2020

माणूस म्हणून जगताना




एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
रंग,रूप,जात धर्म आणि वंश
या पलीकडे जाऊन माणसाकडे बघणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
समोरच्याकडे गुलाम म्हणून न बघता
माणूस म्हणून बघणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
आपल्यामुळे इतरांना

त्रास होणार नाही हे बघणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
स्वतःचा अहंकार बाजूला ठेऊन
सर्वांना एकसमान बघणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
आपल्या घासातला घास काढून
भुकेल्याला घासभर देणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
निर्व्याज मनाने कुणाच्यातरी
गरजेला धावून जाणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
आपल्या स्वार्थासाठी
कायदेकानून  न मोडणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
वसुधैव कुटुम्बकं ही
शिकवण जपणं

एवढं अवघड असतं
का माणूस म्हणून जगणं
हरवत चाललेली माणुसकी
सर्वांनी मिळून जपणं

रजनी✍️



 

Saturday, 12 December 2020

डोळे आणि अश्रू


 


अश्रूंना असते जशी
डोळ्यांची साथ
तशीच लाभू दे मला
सख्या तुझी साथ

डोळ्यात आलेले अश्रू
जसे पापणी आड दडते
तसेच हृदय हे माझे
फक्त तुझ्यासाठी धडधडते

डोळ्यांतून जसा वाहतो
अश्रूचा महापूर
तसेच न्हाऊ दे मला
तुझ्या प्रेमात पुरेपूर

डोळ्यांतला अश्रू जसा
मोत्यासारखा चमकतो
तसाच हा आपला लक्ष्मीनारायणा
सारखा जोडा शोभून दिसतो

रजनी✍️

Friday, 4 December 2020

मनाविरुद्ध लग्न



प्रिय वाचकहो,
सदर साहित्य हे मी म्हणजेच एका स्त्री ने लिहिले असले तरी ही कविता स्त्री-पुरुष दोघांनाही लागू आहे.माझ्या कवितेत कुठलेही Gender descrimination नाही याची कृपया नोंद घ्या.


मनाविरुद्ध लग्न झाले
तरी संसार चुकत नाही
काय स्वप्न,काय सत्य
काहीच कळत नाही

अशा वेळी ऐक जरा
नको विझून जाऊ
मनांत किंतु ठेऊन
समोरच्याला पाहू

सहवासाने लागतो म्हणतात
प्राण्यांनाही लळा
मग तुझ्यासमोर तर आहे
चालता बोलता हाडं मांसाचा गोळा

एकमेकांना आकार देत
जीवन शिल्प घडवा
अन एकमेकांच्या आधाराने
आपले विश्व साकार करा

सुखं आणि समाधान हे
शेवटी मानण्यावर असतं
अन सुखी समाधानी आयुष्यातच
प्रेमाचं नंदनवन फुलतं

रजनी✍️



 

 

Wednesday, 2 December 2020

सरते वर्ष 2020


 

सरते वर्ष दोन हजार वीस

पूर्ण जगायचेच राहिले

टप्प्या टप्प्याने इथे

जगण्याचे मापदंड बदलले


सानथोर  सगळ्यांच्या तोंडी

मास्क विराजमान झाले

कोरोना,पँडेमिक ,लॉकडाऊन

नवे शब्द जिभेवरी आले


कोरोनाचा वाढला ताप

सॅनिटायझर चा वाढला खप

झाल्या शाळा ऑनलाईन

 मुंबईची थांबली लाईफलाईन


हजारो मैल चालत जाऊन

माणसं घरट्यात परतली

माणुसकीला काळिमा फासत

राजकारणे गलिच्छ रंगली


मंदिरे बंद झाली, देव

योद्धय्यांच्या रुपात अवतरले

माणसातल्या देवत्वाचे

या समयी दर्शन घडले


टाळ्या थाळ्या वाजल्या अन

दिवे उजळले जागोजागी

योजना पॅकेजची उधळली खैरात

तरी वाढली फक्त बेरोजगारी


आत्मनिर्भरतेचा नारा देऊन

त्यांनी केली स्वतःची सुटका

काय सोसले सर्वांनी

त्यांना कल्पना तरी आहे का?



सरते वर्ष दोन हजार वीस

सर्वांच्याच लक्षात राहील

स्वतः सोबत माणूस आता

निसर्गाचेही हित पाहिलं


रजनी✍️

Tuesday, 1 December 2020

लग्नाची गोष्ट


लग्नाची गोष्ट असते मोठी रंजक
बोलणी सुरू होताच सगळे होतात हतचिंतक
सल्ल्यांवर सल्ले  देतात इथे सगळे
वधूवरांचे मात्र इकडे चाले काहीतरी आगळे
लग्नाआधीच्या भेटीगाठी,खरेदी ,केळवण
आयुष्यात येते एक वेगळेच वळणं
डीजे,बँडबजा अन सजलेली घोडी
वरातीत नाचायची आगळीच गोडी
मेहंदी,हळदी अन सप्तपदीची लगबग
फोटोशूटसाठी उडते एकच गडबड
जेवणाच्या मग उठतात पंगतीवर पंगती
वधू-वर बिचारे उपाशीच तरंगती
विधी उरकताच होते पाठवणीची घाई
बाबा होतात दुःखी तर रडत राहते आई
आईबाबांची लाडकी लेक ,घरट्यातून उडून जाते
अन उंबरठ्यावरचे माप ओलांडून सौभाग्यवती होते
नवीन घरं,नवीन आयुष्य,नवीन नाती जोडते
अन अशी ही लग्नाची गोष्ट सुफळ संपूर्ण होते.

रजनी✍️



 

घटस्फोट



घटस्फोट घेऊन माहीत नाही
त्यांनी काय  मिळवलं
त्यांच्यामुळे चिमुकल्याचं
बालपण  मात्र हरवलं

आईबाबा अर्ज करी
त्याच्या ताब्यासाठी
पण तो मात्र हट्ट करे
दोघांसोबत राहण्यासाठी

आई म्हणजे मायेचा झरा
कधीही न आटणारा
अन बाबा म्हणजे पाठीराखा
मग किती ही  प्रसंग येऊ दे बाका

खेळणे निवडीच्या वयात त्याला
एकाची निवड करावी लागली
एवढं होऊनही या दोघांची
भांडायची हौस नाही फिटली

तुमच्या संमतीने तो जीव
तुमच्या जीवनात आला
मग बाळापेक्षा कसा तुमचा
इगो इतका मोठा झाला

अपवाद असतात प्रत्येक
गोष्टीत मान्य आहे मला
पण चिमुकल्या साठी तरी तुमच्या
स्वभावाला थोडी मुरुड घाला

नवरा बायको वेगळे होऊ शकतात
पण आई-बाबा नाही
शांतपणे विचार करा
नका करू घाई

हाथ जोडून विनंती करते
पटलं तर बघा
तुझं माझं सोडून
आपलं कुटुंब जपा


रजनी✍️



 

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...