Friday, 4 December 2020

मनाविरुद्ध लग्न



प्रिय वाचकहो,
सदर साहित्य हे मी म्हणजेच एका स्त्री ने लिहिले असले तरी ही कविता स्त्री-पुरुष दोघांनाही लागू आहे.माझ्या कवितेत कुठलेही Gender descrimination नाही याची कृपया नोंद घ्या.


मनाविरुद्ध लग्न झाले
तरी संसार चुकत नाही
काय स्वप्न,काय सत्य
काहीच कळत नाही

अशा वेळी ऐक जरा
नको विझून जाऊ
मनांत किंतु ठेऊन
समोरच्याला पाहू

सहवासाने लागतो म्हणतात
प्राण्यांनाही लळा
मग तुझ्यासमोर तर आहे
चालता बोलता हाडं मांसाचा गोळा

एकमेकांना आकार देत
जीवन शिल्प घडवा
अन एकमेकांच्या आधाराने
आपले विश्व साकार करा

सुखं आणि समाधान हे
शेवटी मानण्यावर असतं
अन सुखी समाधानी आयुष्यातच
प्रेमाचं नंदनवन फुलतं

रजनी✍️



 

 

4 comments:

धिरज said...

वाह, फारच छान, सूंदर

Unknown said...

Chan

छंदिष्ट्य said...

खुपच छान काव्य मानवी जीवनात जगरहाटीचे संकेत बाळगावेच लागतात

छंदिष्ट्य said...

खुपच छान काव्य मानवी जीवनात जगरहाटीचे संकेत बाळगावेच लागतात

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...