Monday, 13 June 2022

अलक -अनामित संबंध

 

               अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या येण्याने तो ही प्रसन्न व्हायचा. पण ह्यावेळी त्याला भेटायला गेल्यावर तिला खूप दुःख झाले. ती सुन्न झाली कारण रस्ता रुंदीकरणासाठी त्याला मुळासकट तेथून उपटले होते.

सौ. रजनी भागवत✍️©®
13/6/22


श्यामलाक्षरी रचना- मित्र

 

शीर्षक- मित्र

वर्ण संख्या-9

*मित्र* रोज येतो गगनी
प्रकाशित करी धरणी
*मित्र* येता तो आयुष्यात
दिशा दाखवी या जीवनी

*गंध* मैत्रीचा दरवळे
बहरून जाई आयुष्य
*गंध* लावताच कपाळी
उजळून निघे आयुष्य

*हात* मैत्रीचा घेता हाती
उबदार ती साथ मिळे
*हात* असता त्या कार्यात
यश ही हमखास मिळे

*हवा* वाहे ती चोहीकडे
प्रसन्न मन होत असे
*हवा* मित्र तो आयुष्यात
सुखदुःखात साथ असे

मित्र- सूर्य
मित्र- मित्र, सखा
गंध- सुवास
गंध- टिळा
हात- कर
हात- सहभाग
हवा- वारा
हवा- पाहिजे

सौ. रजनी भागवत✍️©®

चित्र काव्य- अष्टाक्षरी रचना

 


पाय तुझे सुकुमार
दुडूदुडू धावणार
मऊ मखमली स्पर्श
मनी माझ्या उरणार

बोट धरून आईचे
पाऊल तुझे टाकणे
रम्य तुझ्या आठवणी
माझे तुझ्यात गुंतणे

उड्या मारून धावणे
तुझे सदा सर्वकाळ
खेळासाठी तु तयार
तुझ्यासवे धावे काळ

शाळेतील कवायत
मित्रांसवे मौज मस्ती
नकळत होई मोठा
कसे दिवस धावती

बळ येणार तुझ्यात
आधार माझा होशील
शिक्षण घेऊन छान
वार्धक्यात जपशील

स्वप्न आहे बाळ माझे
यश किर्ती तुला लाभो
पांग फेडून या आईचे
समाधान तुला लाभो

सौ. रजनी भागवत.
13/6/22


अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...