Wednesday, 30 September 2020

तुला कळणार कधी(कोरोना)


नवीन वर्षात जगामध्ये
आगंतुक पाहुणा आला
अन् आल्या आल्या
लोकांना संसर्ग त्याने दिला

जगात येताच शास्त्रज्ञांनी
बारसे त्याचे केले अन्
छान असे कोरोना नाव दिले
नावा सम याने मग
आपले गुण दाखविले

बाललीला दाखवत दाखवत
माणसे कैद केली अन्
वाहतूक ठप्प करत करत
त्याने शाळा बंद केली

माणूस माणसाला पारखा केला
अन् स्पर्शासही भिऊ लागला
आरोग्यव्यवस्था गडबडली
अन् अर्थव्यवस्था कोलमडली

खरं सांग ना करोना तू
जाणार आहेस कधी
सर्वांचे शिव्याशाप का
गीच घेतोय माथी

आतातरी कोरोना तुला कळणार
आहे का काही पाहुणा म्हणून
जास्त राहणं मुळीच बर नाही
रे बाबा मुळीच बर नाही......

रजनी


 

Monday, 28 September 2020

उनाड वरा अन् उनाड मन


उनाड झाले मन
उनाड या वाऱ्या परी
अन् घेऊ लागले हेलकावे
गतकाळाच्या फांदीवरी

उनाड वाऱ्यासम
मन हलकं हलकं झाले
अन् उडत उडत जाऊन
आईला बिलगुन आले

उनाड वाऱ्यासम
मन खट्याळ ही झाले
अन् खट्याळपणा करीत
भावंडाना छेडून आले

उनाड वाऱ्यासम
मन सैरभैर झाले अन्
पापणीची नजर चुकवून
अश्रू गाली ओघळले

रजनी


 

Sunday, 27 September 2020

मनातलं वादळ


विचारांचे उमटले वादळ
अन् काहूर मनी दाटले
तो आणि कुटुंबामध्ये
तिने कुटुंबाला निवडले
नीती अनितीच्या चक्रात
अडकून फाटली आहे
तिच्या मनाची चादर
आता तरी करेल का कुणी
तिच्या हळव्या मनाचा आदर
त्याग म्हणता येणार नाही
पण स्वार्थी ही कुणी नका म्हणू
दोन क्षणासाठी तरी तिच्याकडे
माणूस म्हणून आता पाहू

रजनी


 

Friday, 25 September 2020

मैत्रिणींच्या गप्पा


सात सुरांनी सजते जशी
संगीताची मैफिल
माझ्या सख्यांसोबत रंगते
आमची गप्पांची मैफिल

सोबतीने जातो आम्ही
गप्पांच्या गावा अन
सर्वांनाच वाटतो आमच्या
मैत्रीचा हेवा

बोलण्यासाठी आम्हाला
चार क्षण पुरतात पण
संसाराच्या राम रगाड्यात
ते ही कुठे मिळतात

मुलांच्या शाळेनिमित्ताने
पूर्वी नेहमी भेटायचो
हळदीकंकू,वाढदिवस सेलिब्रेशन
गप्पांचे फड जमवायंचो

कोरोना ने आमची
लावली आहे वाट
गप्पा ही साठल्या आहेत
मनात सतराशे साठ

तुम्ही म्हणाल फोर जी (4G) च्या
जमान्यात काहीच अवघड नाही
पण खर सांगू मनापासून
गळाभे टी ची मजा मोबाईल मध्ये नाही

प्रार्थना करते देवा
सर्व पूर्वीसारखे कर
अन् जमू दे परत
आमचे गप्पांचे फड

रजनी


 

Thursday, 24 September 2020

कोरोना काल में त्यौहार


 

भारत देश हमारा प्यारा
यह सारे जहां से निराला
यहां त्यौहारों की भरमार
त्योहारों से बढ़ता आपस में प्यार

झंडावंदन,रक्षाबंधन
ईद,बैसाखी
दीवाली, दशहरा
इनसे बढ़ता भाईचारा

इस वर्ष कैसा मौसम आया
त्योहारों पर छाया कला साया
कोरोना ने अपना कहर बरसाया
भाई बहन से मिल ना पाया

केहते है उम्मीद पे दुनिया कायम है
सोशल डीस्टांसिंग में भी हम साथ है
हर त्यौहार खुशी और सादगिसे मनाएंगे
दशहरे में रावण को नंही, कोरोना को जलाएंगे

सार्थक भागवत।



ती छत्री आणि तो


 

त्याच्याकडे होती एक छत्री
नाजूक पण देखणी
तलम कापड, नीली झाल
फुलपाखरांची चित्र रेखाटलेली

छत्री असते छत्री सारखी,
त्यात विशेष ते काय
निळा रंग निळी झालर
त्याचे अप्रूप ते काय

पैसा पैसा जोडून त्याने
तिच्यासाठी घेतलेली
त्याची भेट म्हणून
तिनेही जिवापाड जपलेली

पाऊस पडू लागल्यावर
तो छत्री उघ डायचा
दांडी,काड्या, कापडामध्ये
तिचा स्पर्श शोधायचा

इमोशनल असतात माणसं
जे वस्तूंमध्ये आठवणी शोधतात
निर्जीव असतात वस्तू म्हणूनच
त्यांच्यात आठवणी चिरकाल टिकतात

रजनी


Tuesday, 22 September 2020

टाइम ट्रॅव्हल


 एके दिवशी अचानक चमत्कार झाला
दारी अवतरले टाईम ट्रॅव्हल यान
अन् माझा प्रवास सुरू झाला

आत पाऊल टाकताच आवाज कानी आला
भूतकाळात जाण्यासाठी लाल बटणं दाबा
अन् भविष्यकाळात जाण्यासाठी हिरवे बटण दाबा

लाल बटणं दाबून मी भूतकाळात गेले अन्
एका क्षणात यान माहेरच्या अंगणात उतरले
खेळलेले खेळ क्षणात नजरेसमोरून तरळले

स्वतः लाच आईच्या कुशीत अंतरावरून बघितले
बाबांचे ते प्रेमळ रूप भरभरून मनात साठविले
भावंडांशी दंगा मस्ती ,शाळा मैत्रिणी सांगू किती

बझरच्या त्या आवाजाने यानाने मला बोलाविले
आता जाऊन मग मी पॉ झ चे बटणं झोधू लागले

माझी शोधाशोध पा हून यान महाराज उद्गारले,

जगाने केली प्रगती,विज्ञाना ने केली कितीही क्रांती

तरीही स्त्रीचे मन घुटमळते तिच्या माहेराशी😊😊


रजनी

Friday, 18 September 2020

फेसबुक वरची लव्ह स्टोरी



रटाळ अश्या माझ्या आयुष्यात
आशेचा किरण चमकला
अन फेसबुक वर माझ्या
एक मैत्रीचा मेसेज झळकला

प्रोफाइल फोटो पाहून
मी गेलो हरखून
माझे कॉलेज क्रश पाहून
त्या दिवसात गेलो हरवून

लेक्चरला मी तिच्यासाठी बसायचो
प्रोजेक्टसाठी मी तिच्या ग्रुप मध्ये शिरायचो
कपाळावर रुळणारी तिच्या केसांची बट
मी नेहमी स्वप्नात अलगद कानामागे सारायचो

आठवणींनी या अंग माझे शहारले अन
बायको म्हणाली कुणाचा मेसेज वाचण्यात
एवढे दंग झाले, ऑफिस कलीग आहे
सांगून मग लॅपटॉप मी उघडले

थरथरत्या हाताने अन धडधडत्या हृदयाने
चॅटिंग सुरू केली, अन जुन्या आठवणीत
रमता रमता काही आठवडे गेली

चॅटिंगपासून डेटिंगचा पार केला पहिला टप्पा
बायकोपासून लपविण्यासाठी,पहिल्यांदाच
मारल्या शंभर थापा.

रम्य अश्या संध्याकाळी,पोहचलो मी ठरल्यावेळी
पाठमोरी ती बसलेली,जणू अप्सरा अवतरली धरतीवरती
जवळ तिच्या जाताक्षणी,हृदयी कळ उठली भारी
कारण
कारण
....
अप्सरा नव्हे,ही तर चक्क बायको होती अवतरलेली,😧😳

रजनी


 





 

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...