धकाधकीच्या या जीवनात माणसाची भौतिक गोष्टींमधील गुंतवणूक खूप वाढली आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल .या मोबाईल मध्ये हल्ली बऱ्याच लोकांचा जीव गुंतलेला असतो त्यानिमित्ताने काही ओळी सुचल्या आहेत ,त्या इथे सादर करते.
तुझ्यात जीव रंगला
आणि तू माझ्या जवळ आला
माझ्या छोट्याश्या आयुष्याचा
मोठासा भाग झालास
नवी नवी दालने
तू माझ्यासाठी उघडलीस
माझी मात्र इकडे
धांदल उडाली
तुझ्या आगमनाने पुन्हा
मी मलाच शोधू लागले
नवीन रूप पाहून माझे
सर्वजण हरखले
एवढंस ते यंत्र
करतो नेहमी सोबत
तुझ्याशिवाय आता एक क्षणही
मुळीच नाही करमत
रजनी

















