Saturday, 25 July 2020

एक निवांत क्षण

आज प्रथमच हायकू लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.

एक निवांत दुपार
हातात आवडते पुस्तक
ना दारावर टकटक

एक निवांत दुपार
टीव्हीवर आवडता चित्रपट
ना मुलांची वटवट

एक रम्य संध्याकाळ
अथांग समुद्रकिनारा
तुझ्या आठवणींचा पसारा

रजनी



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...