Wednesday, 22 July 2020

लव्ह यु जिंदगी




टँह्या टँह्या करत,माणूस जन्मां येतो
नवजात शिशु ते जख्ख वृद्धत्व
त्याचा प्रवास चालतो

एकाच या आयुष्यात,खूप नाती जोडतो
प्रत्येक वेळी नात्यातील,
नवीन रंग पाहतो

निरागस बालक सर्वांवर प्रेम करतो
तर तोच वृद्ध प्रेमासाठी तरसतो
जिंदगीच्या चक्रात तो
असाच गुंतून पडतो

एकच तर आहे जिंदगी
चल थोडे जगून घेऊ
आयुष्यातल्या दुनियादारीत
मोकळा श्वास शोधत राहू

रजनी

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...