चारोळी
1) लग्न झाल्यावर ती
अनोळख्या जागी रमते
परि अंतरी आपुल्या
माहेराची आठवण काढते
2) अनोळख्या जागी त्यांच अस
भेटण हे सहजच घडून आलं
न जाणे छेडल्या कुठल्या तारा
अन हृदय धडधडू लागलं
कविता
अनोळख्या जागेवरती त्या
सर्वांनाच एक दिवशी जाव लागतं
पण जायच कधी आणि कसे
हे मात्र कुणाच्याच हातात नसतं
म्हणूनच मिळालेल आयुष्य
भरभरुन जगायंच असतं
भूतकाळात अडकायच नसतं
भविष्यकाळात रमायच नसतं
चालू क्षणात जगायचं असत
लेट गो करायला शिकायचं असत
जीवन हे असचं असत
अनोळख्या जागेवर सुरु होत असत
अन अनोळख्या जागेवरच संपत असत
म्हणूनच तुझं माझं न करता
एकत्र प्रेमाने रहायचं असतं
रजनी✍️
No comments:
Post a Comment