अजोळ
अजोळ असतं आईसाठी
हक्काचा विसावा
अन लेकरांसाठी असतो
चिरंतन आनंदाचा ठेवा
मुल मोठी होताना
मुले मोठी होताना
त्यांच्या बरोबर चालताना
थोड़स शिकवत, खूपसे शिकत
येते मजा जगताना
समाधानाच हसु
१) भरजरी शालू, सोळा शृंगार
करुन सौंदर्य तिच खुलतं
पण एका प्रेमळ कौतुक कटाक्षाने त्याचा
चेहऱ्यावर समाधानाचं हसु फुलत
२) सुखी समाधानी आयुष्य
आता इतिहासजमा झालय
अन बदलत्या जीवनशैलीमुळे
सतत धावण नशीबी आलय
संगोपन
नकळत जुळलेल नांत आपल
मोगऱ्या सारख बहरल
तुझ्या संयमाने अन माझ्या प्रेमाने
आपण त्याचं संगोपन केलं
तो
तो खूप संयमी होता म्हणून
तीला तो खूप आवडायचा
प्रितीच्या लाटेवरही अंतर
राखून असायचा
ट्रॅफिक जॅम
१) बदलत्या जीवन शैलीचे
आणखी एक फलित
वीकएंड साजरा करतात
लोकं ट्रॅफिक जॅम झेलित
२) विचारांची गर्दी होऊन
मनांत होता ट्रॅफिक जॅम
ब्रेक लावून संयमाचा
सहज सोडवावा तो जॅम
रजनी✍️
No comments:
Post a Comment