Thursday, 8 October 2020

संचयी प्रभाव( अलक कथा)


तो आणि ती एक छान जोडपं.नवे नवलाईचे दिवस संपवून खरया संसाराला लागलेलं.एकमेकांचे कंफर्ट झोन ओळखून कधी प्रेम तर कधी भांडण करीत मजेत दिवस चालले होते. असच एका दिवशी दुपारी तो लॅपटॉप वर ऑफिसच काम करीत होता तर ती त्याच खोलीत खाली बसून भाजी निवडत बसली होती.
               काम करता करता तो तिला म्हणाला,"cumulative effect  म्हणजे काय माहीत आहे का तुला "?ती म्हणाली त्याचा शब्दशः अर्थ आहे " संचयी प्रभाव".ती कुणी शिक्षिका नव्हती किंवा तत्वज्ञ पण नव्हती,पण कुणी काही विचारले की तिच्यातील शिक्षिका जागी व्हायची.त्याचा कडे न पाहता ती म्हणाली , व्यवहारातले उदाहरण देऊन explain करू.

                    ती बोलू लागली, सर्वसाधारण पणे माणसे प्रसंगानुरूप आप आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद व्यक्त  करत असतात,म्हणजे जर माझे वागणे  analyze कराल तर प्रसंग 1=प्रतिक्रिया/प्रतिसाद प्रसंगानुरूप 1,प्रसंग 2=प्रतिक्रिया /प्रतिसाद 2 आणि अश्याच पद्धतीने पुढच्या प्रसंगासाठी इथपर्यंत ठीक आहे .हा झाला एक पॅटर्न आता दुसरा पॅटर्न बघू,
                    तुमच्या आईचे उदाहरण घेऊया प्रसंग तेच पण  प्रसंग 1=प्रतिक्रिया /प्रतिसाद काहीच नाही,प्रसंग 2=प्रतिक्रिया /प्रतिसाद काहीच नाही,प्रसंग 3=प्रतिक्रिया/प्रतिसाद काहीच नाही,असे करत करत कुठल्यातरी एका प्रसंगाला म्हणजे प्रसंग क्ष =प्रतिक्रिया  1+2+3+...... क्ष्
                   सर्व बोलून झाल्यावर तिच्या लक्षात आले,की बोलता बोलता आपण खूप काही बोललो. मग सावरून घेत ती बोलली अग बाई किती उशीर झाला चहाची वेळ झाली,गप्पांच्यामुळे लक्षातच नाही आल, मस्त आलं घालून चहा करून आणते लगेच आणि ती किचन मध्ये निघून गेली.
                किचन मध्ये जाऊन विचार करत राहिली की,आपण येवढे बोलूनही ह्यांना नेमके कळेल का की,ह्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया/प्रतिसाद द्यावा,पण प्रतिक्रिये पेक्षा प्रतिसाद दिला तर बरं होईल कारण,


"Sometimes we don't need advice
We just need someone to listen to us"
.

रजनी✍️
                




Tuesday, 6 October 2020

जादूचा दिवा

 


जादूच्या कथा लहानपणी खूप आवडायच्या
आटपाट नगर ,जादुई परी  मन माझ रिझवायच्या

जादूच्या कथेची होती बातच न्यारी
जादुई मंत्र उच्चारताच हजर असे परी

जादूची छडी अन् जादूचा दिवा,कथेमध्ये असायचा
दिवा घासू लागताच राक्षस प्रकट व्हायचा

सतत सोबत राहून "क्या हुकुम है मेरे आका म्हणायचा"
छोटी मोठी कामे आपली चुटकीसरशी करायचा

लहानपण सरल मागे वय आता वाढलं
जादुई दुनियेचे वेड मग हळूच मागे पडलं

तरीही वाटते मिळावा कथेतला जादुई दिवा
घासताना त्यातून  मात्र राक्षस यायला हवा

दिव्यातला राक्षस  म्हणेल,"क्या हुकुम है मेरे अाका"
मी म्हणेल, तुला कसं राक्षस म्हणू तू नाहीस रे क्रूर इतका

न्यायदेवता आमची आंधळी अन् राजकारणी भाजतात त्यांचीच पोळी
वासनेच्या या अग्निकुंडत ,इथल्या मुलींची होतेय होळी

"बा राक्षसा तू  आता एकच काम कर ,मानवाच्या रुपात वावरणाऱ्या प्रत्येक नराधमाच्या  खांडोळ्या खांडोळ्या कर."😠😠



अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...