Friday, 15 October 2021

भावनेच सूत्र

 

माझं असं काही शोधू पाहते
विझलेल्या माझ्यातच मी
नवीन समीकरणे मांडू पहाते
जुन्याच सुत्रांवर अवलंबून मी
मांडताना वाटलं सोपं असेल सगळं
नव्याने गणित मांडलं तर उत्तर येईल वेगळं
पण उत्तर आले वेगळे तरी मला ते समजेल का
जुन्याच सूत्रात आता सर्व नव्याने बसेल का
मनाचा गुंता आणि आकड्यांच्या खेळ
माहीत नाही मी कसा साधणार यांचा मेळ
कारण साधसुध नाही हे गणित आहे वेगळं
उशिरा का होईना मला हे कळल
भावनेच्या सूत्रात सगळं नव्याने बसवून बघते
अन अवघड हे गणित आता सोडवून पाहते

रजनी✍️©®
12/10/21


चारोळ्या

 विषय: 

        त्या आठवणींना हद्दपार करायचं होतं
          पुन्हा एकदा त्यांच्यात अडकायच नव्हतं

            चारोळी: सीमोल्लंघ

त्या आठवणींना हद्दपार करायचं होतं

पुन्हा एकदा त्यांच्यात अडकायच नव्हतं

म्हणूनच सीमोल्लंघन करायचं होतं

पण मनातल्या वेशीना मात्र मान्य नव्हत

रजनी✍️

13/10/21

              चारोळी: माझं अडकण

मनातल्या वेशीना मान्य नव्हत

तुझ्या आठवणींनी हद्दपार होणं

पण राहिल्या असत्या त्या तर

ओघाने आलेच असत माझं अडकण

रजनी✍️

13/10/21


                    मुक्तछंद -अतिक्रमण

त्या आठवणींना हद्दपार करायचं होतं

ज्यांनी मनावर केलं होतं अतिक्रमण

अडकून त्यांच्यात अवघड

झालं होतं माझं जगणं

पण मनातल्या वेशीना मात्र मान्य नव्हतं

त्यांचं हद्दपार होणं

मग त्यांनीही चालू ठेवल

 होत मला दिवसरात्र छळण

रजनी✍️
14/10/21



Monday, 11 October 2021

धुक्यात विरलेलं स्वप्न


 

काय सांगू मंडळी
कसा चमत्कार झाला
अन अहों ना माझ्या
अचानक साक्षात्कार झाला
बायकोला ही मन असतं
याची आली बहुतेक प्रचिती
अन कशी काय अचानक
ही जादू घडली
लाडात येऊन अहो म्हणाले,
एका दिवसाच्या बर्थ डे पार्टीच
काय घेऊन बसली
आपण बर्थ डे वीक साजरा करू
मस्तपैकी बाहेरगावी नाहीतर
देवदर्शनाला जाऊ
पण त्या अगोदर बर्थ डे गिफ्ट म्हणून
छानश्या साड्या तुला घेऊ
पडत्या फळाची आज्ञा घेऊन
मी लिस्ट बनवली अन
भरगच्च कपाटात माझ्या
नवीन साड्यांसाठी कशीबशी जागा बनवली
दुसऱ्यादिवशी ह्यांच्यासोबत साड्या घ्यायला गेले
एकीकडे जॉर्जेट,शिफॉन,नारायण पेठ,अन इरकल
तर दुसरीकडे कांजीवरम,पाटलीपल्लू बरेच प्रकार घेऊन
शेवटी पैठणीवर डोळे खिळले........
आहोंची संमति मिळताच जवळजवळ तरंगतच
मी काउंटरवर गेले.........
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अलार्मच्या आवाजाने डोळे माझे उघडले
पहाटेचे स्वप्न माझे आता होते सरले
आणि वाढदिवसाला पैठणी घ्यायचे स्वप्न
होते धुक्यासारखे विरले😔😔

🍁🍂🌿🍂🌿🍁🍂🌿🍁🍂🌿🍁🍂🌿

रजनी✍️

11/10/21


Sunday, 10 October 2021

वेदना मनाची अन देहाची

 


वेदनेला फुंकर असावी

मनाच्या अन देहाच्याही

फुंकर मिळताच वेदना मिटावी

मनाची अन देहाचीही

देहाची वेदना विसरता येते

पण मनाची विसरत नाही

वेदनेच्या त्या रात्री सरता सरत नाही

मनाच्या वेदनेवर फुंकर असावी

सख्या तुझ्या प्रेमळ मिठीची मग

मिठीत तुझ्या ती रात्र सरावी

अन प्रेमाची पहाट ही आता लवकर व्हावी

रजनी✍️©®

10/10/21


Thursday, 30 September 2021

गोडवा



                                                            
                                         तुझं माझं नात

मंगळसूत्राने जोडलेलं

नवरा बायकोपेक्षाही

मित्र म्हणून स्वीकारलेलं

तुला माझी अन मला तुझी

सवय झाली आहे इतकी

दुधात साखर सहज

विरघळले जितकी

मिश्रणाच्या या गोडव्याचा

नैवेद्य चालतो देवाला

तसाच गोडवा देऊया

आपण आपल्या संसाराला

रजनी✍️
30/09/21

Wednesday, 29 September 2021

शेलचारोळी

अलीकडेच चारोळीचा हा नवीन प्रकार माझ्या वाचनात आला प्रतिलिपिवरील माझे जेष्ठ बंधू श्री. चंद्रकांत येवला यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मी या चारोळ्या रचल्या आहेत.

या प्रकारच्या चारोळीमध्ये प्रत्येक ओळीतील अक्षरसंख्या सारखी असते .तसेच दुसऱ्या व चवथ्या ओळीत यमक जुळवलेल असते.पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दाने, दुसऱ्या ओळी ची सुरुवात होते तसेच तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाने चवथ्या ओळीची सुरुवात होते.

   1) गुंतून गेलो (23/09/21)

हरवलेले ते शब्द
शब्द शोधत राहिलो
गवसले ते तुझ्यात
तुझ्यात गुंतुन गेलो

 2)वेडं मन (23/09/21)

आयुष्य वाहतय पुढे
पुढे वाहत जाईल मी
मन वळतयं हे मागे
मागे ना वळणार मी

 3)सखे (25/09/21)

हरवलेले ते शब्द शोधताना
शोधताना गवसलीस तू सखे
किणकिण करती तुझी काकण
काकण गूज तुझे सांगती सखे

  4) मोल (27/09/21)

आले गेले किती हे विचार
विचार ते आपल्या प्रेमाचे
अलिप्त राहून ते कळले
कळले मोल तव प्रमाचे

        5)अपराध भाव (28/09/21)

अवेळी मला सतावतील
सतावतील त्या आठवणी
प्रेम केले हा तो अपराध
अपराध भाव या जीवनी

    6)गणित भावनेचे(28/09/21)

काय कमवलं अन काय गमवलं
गमवलं तुला आता उरलंय काय
मांडून बसलेय  भावनेच गणित
गणित मांडून असे साधलंय काय

7) इच्छा (28/09/21)

कठीण असं काही नसतं
नसतं करायचं मनांत
सगळं होतं असता इच्छा
इच्छा फक्त पाहिजे मनांत

  8)खडे बोल (28/09/21)

कोणी असं म्हणत नाही
नाही बोलायचं तू काही
बोलल्यावर खडे बोल
बोल कुणी ऐकत नाही

 9) विरह (29/09/21)

विरह संपता संपेना
संपेना तुझा बहाणा
गडद झाली आहे रात्र
रात्र जीवघेणी सरेना


रजनी✍️




व्यवहार आणि भावना

काय मिळवलं अन काय गमवलं?

याची तुलना करू कशी?

मिळवल्याचा आनंद छोटा
पण गमावल्याची खंत आहे मोठी
मिळवल्याचा गुणाकार जमेना
अन गमावल्याचा भागाकार येईना
आयुष्याचा ताळेबंद हा काही केल्या उमजेना
गणिताचे नियम काही इथे लागू होईना
मांडताना वाटलं सोपं आहे सगळं
नेहमीची ती आकडेमोड त्यात काय वेगळं
पण व्यवहार आणि भावना यांचं गणित नाही जमलं
माहित नाही हे गणित मांडून मी नेमकं काय साधल?

रजनी✍️
25/09/21

Tuesday, 28 September 2021

हॉल आणि बेडरूम चे मनोगत


 आपल्या सर्वांना माहित आहे की, करोना महामारी येऊन आता खूप काळ लोटला आहे आणि आपण सर्व या न्यु नॉर्मल जगाला हळुहळु आत्मसात करित  आहोत.

        पहिल्या लाकडाऊनच्या वेळी मला " लॉकडाऊन मध्ये भांड्यांचे मनोगत" ही कविता सुचली होती त्याची लिंक मी खाली देत आहे नवीन वाचकांसाठी आणि आज , ह्या कवितेचा विषय सूचला व मी ही रचना केली. कवितेत सांगितल्या प्रमाणे खरचं माझ्या बेडरूमला ऑनलाईन  शाळेचे रुप आले आहे , सकाळ पासून दुपारपर्यंत मुलाचे classes असतात तर दुपारी  मुलीचे क्लासेस असतात. त्यामुळे आज हा विषय सूचला व ही रचना केली आहे . आशा करते ही रचना तुम्हांसर्वांना नक्की आवडेल☺️☺️🙏🙏
  
हॉल आणि बेडरुम
एकाच घरातले दोन भाग
हॉल चैतन्याचे प्रतीक तर
बेडरुममध्ये सापडे शांततेचा माग
हॉल असतो गजबजलेला
तर बेडरूम शांत पहुडलेला
पाहुण्यांचे स्वागत हॉलमध्ये होई
तरी बेडरुममध्ये निद्रादेवी चे आगमन होई
गप्पाटप्पा अन जेवणावळी टीव्हीच्या
साक्षीने हॉलमध्ये घडे
तर थकलेलं शरीर अन मन
जाऊन बेडरुममध्ये पहुडे
या अश्या दिनक्रमाला
दोघे होते सरावलेले
नव्हती कसली चिंता
मजेत दिवस चाललेले
.
.
.
.
.
.
अचानक करोनाचे आगमन झाले
दोघांचेही दिवस पालटले
पाहुण्यांचे आगमन कमी झाले
तर ऑनलाईन शाळा बेडरूममध्ये चाले
हॉल ने आपले चैतन्य गमावले
तर बेडरुमचे मात्र निवांतपण हरपले.
.
.
.
.
.
मनुष्यासोबत आता ही दोघे करती प्रार्थना
.
.
.
.
.
.
तुझ्या आगमनाने बाप्पा पुन्हा सुर होऊ दे पाहुण्यांचे येणेजाणे रंगू दे गप्पांची मैफिली, हास्य विनोद  आणि सुग्रास खाणेपिणे.
बेडरुमला ही थोडासा निवांतपणा मिळू दे
झोपण्याव्यतिरिक्त नसावे कुणाचे फारसे येणे जाणे..
.
.
.
.
...
.
.
बोला " गणपती बाप्पा मोरया"🙏🙏🙏

रजनी✍️©®
3/09/21


https://rajanibhagwat.blogspot.com/2020/07/blog-post_4.html

Friday, 17 September 2021

सार इथं आलबेल आहे

 


तिथे काय खळबळ आहे?
याचीच असते चिंता
सोडवायचं ठरवलं होतं
पण वाढतच गेला गुंता
तु असा का गेलास
काहीही न सांगता
चुकलंच रे माझं मीच भांडले
तुझ्याशी शहानिशा न करता
कुठे असशील ,कसा असशील
हेच विचार सतावतात
तू तर येत नाहीस
पण तुझ्या आठवणी येतात
डोळ्यांत प्राण आणून मी
तुझीच वाट पहात आहे
एक तुझी काळजी सोडली तर
सार इथं आलबेल आहे

रजनी✍️©®
17/09/21


Wednesday, 15 September 2021

ती ( कॉफी ) आणि तो ( चहा)


 

त्याला चहा आवडायचा
पण तिला मात्र कॉफी
कुठल्या हॉटेलमध्ये जावं
याची नेहमीच पंचाईत व्हायची
त्यानं अमृततुल्य निवडलं
तर तिला कॅफे कॉफी डे हवं असायच
थोडा वेळ एकत्र घालवावा म्हंटल तर
हे चहा कॉफीचं भांडण जुंपायच
कसली ती कडू कॉफी
का उगीच प्यायची त्यापेक्षा
चहा च बरा त्याची बडबड चालायची
त्याच्या अश्या बोलण्यावर
ती खूप चिडायची , न बोलता त्याच्याशी
तिथून निघून जायची
एका कपातून चहा प्यायचा
त्याची होती फॅन्टसी
तर चिंब भिजल्यावर एक कॉफी
आणि त्याची मिठी हीच तिची फॅन्टसी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फॅन्टसी मनातच राहीली
अन त्यांचं ब्रेकअप झालं
चहा कॉफीच भांडण असं
कॉफी मग आणि चहाच्या कपात विरलं
कॉफी आवडत नसली तरी
ती त्याला आवडायची
त्याच्या आठवणीत ती ही
चहाच्या कपासोबत रात्र जागवायची
.
.
.
.
.
.
.
.
त्याच्या मनांत मात्र तिची जागा अजूनही आहे
तिच्या आठवणी काढत कॉफीमुळे तो जागा आहे.

रजनी✍️©®
16/09/21


Saturday, 11 September 2021

प्रेमभंग

 

मन वेडे खट्याळ आहे
जे तुझ्यातच रमते
तुझ्या एका कटाक्षासाठी👁️
दिवसरात्र झुरते
अबोल प्रेम हे माझे♥️
माझ्या नजरेतच दिसते👀
कळत असुनही तुला
मग का नच उमगते
कामाचे करुन  बहाणे
तुझे हे नजर चोरणे👀
पुरे कर आता स्वतःला
विश्वामित्र समजणे
बर नाही हं हे तुझं मला
टाळून दुसऱ्या मेनकेची वाट बघणे👰
हे असचं होत राहीलं तर अटळच आहे
आता माझा प्रेमभंग होणे😔😔💔💔

रजनी✍️©®
8/09/21


मुखवटे


 

नाती नव्याने कळावी
असे काहिसे झाले
आपलेपणाचे मुखवटे
क्षणार्धात गळून पडले
ज्यांना समजत होते माझे
तेच परके निघाले
ज्यांच्याकडून नव्हती अपेक्षा
त्यांनीच दुःख दिले
आपलेपणाचे घाव हे
मी मूकपणे सोसले
ज्यांना नव्हती किंमत
अश्यांसाठी होते अश्रु ढाळले
पुरे झाले आता
मी मनाशीच म्हणाले
खूप भावनिक असणे
हे ही नाही चांगले.......

रजनी✍️©®
9/09/21


Friday, 10 September 2021

शेरोळी-11 ते 20

                         शेरोळी -11( बेगाना)

अंतरी माझ्या कुठे

भाव ते पुन्हा उठे

इस कदर मूँह फेर के चले गये के |

बेगाने भी ना बने और अपना भी ना कह सके|

                     शेरोळी -12( गुमसुम दूरियाँ)

दुरावा हा अबोल आहे

भाव हा अनोखा आहे

अनोखे जज़बात का सैलाब ये आया है ।

 गुमसुम सी दूरियाँ भी साथ में लाया है। 

                   शेरोळी -13( मौका)

सारे इशारे भलतेच होते

 तुला काहीच कळले नव्हते

 एक इशारा क्या किया हमने , आपसे पीछा छुड़ाने का | 

आप ने समझा मौका मिल गया हमे छेड़ ने का | 

                   शेरोळी-14( दोस्ती)

भाव हे भलतेच होते

 शब्दावाचून कळते होते

 खामोशियाँ ने बयाँ किए दिल के जज़बात है |

 हम समझें दोस्ती पर उनके मन में प्यार है | 

                   शेरोळी-15( बिदा)

निरोप ही हळुवार असावा

हृदयावर हलका भार असावा

धीरे धीरे आप से बिदा हो रहे है |

दिल पे हल्का सा बोझ महसूस किये जा रहे है |

                    शेरोळी-16( समय)

ती वेळ परत यावी

 भीती कशाची नसावी

 काश वो हसीन समय फिर सें आये |

लेकिन आप सें बिछड़ने का डर हमें न साताऐ |

                    शेरोळी-17( टुटा दिल)

आता मला सांग काय करायचं ?

झालं गेलं कसं विसरायच?

बीती बाते कैसे भुलाऊँ |

कोई तो बताओ टुटा दिल लेके कहाँ जाऊँ |

                     शेरोळी-18( राज)

गूढ हे अंतरीचे

कसे उमजावे भाव मनीचे

उन लोगों के जज़बात समझना मुश्किल है जनाब |

जो दिल में गहरे राज छुपाए बैठे है।

                   शेरोळी -19( नजरे)

विसरुन जाशील का?

पुन्हा एकदा हसशील का?

हमे भुला के जाने वाले जरा इधर तो नजरें घुमाओ |

जाने सें पेहले जरा एक बार तो मुस्कुराओ |

                  शेरोळी-20 ( घाव)

अपुरा हा भाव आहे

मनात तोच घाव आहे

आधे अधुरेसे हम और हमारे जजबात है |

दिल में बसा अब वही एक घाव है।


रजनी✍️©®




Monday, 6 September 2021

अहम् अर्थात इगो


 

नात्याची वजाबाकी करायची
म्हणजे नेमकं काय करायचं
जवळच्या व्यक्तीच्या लिस्ट
मधलं एक नाव काढायच
प्रत्यक्षात न भेटता फक्त
आठवणीत रमायचं
आडून आडून त्याची
माहिती काढत रहायचं
लांबूनच त्याच्या यशात
आपण खुश व्हायचं अन
त्याला दुःख झालेल
पाहून आपण दुःखी व्हायच
कळतं असते सर्व पण
वळवून नाही घ्यायचं
किती ही मनांत आलं तरी
आपला हेका नाही सोडायचं
अचानक समोर आलेच
तर मान वळवून घ्यायचं
एवढुश्या त्या इगोला
उगीच गोंजारत बसायचं
अशा वेळी मित्रांनो मतभेद
तिथे सोडून देण्यात खरं सुख असतं
कितीही वजा करायच ठरवलं तरी
काहीतरी बाकी रहात असतं

रजनी✍️©®
6/09/21

Wednesday, 1 September 2021

शेरोळी 1-10

                          शेरोळी -1( घर की मूर्गी)

दूरवर जे काही आहे  

त्याची ओढ जवळ आहे 

बीबी चाहें कुछ कर लें 

घर की मूर्गी दाल बराबर है|😃😃😃


                          शेरोळी -2 ( चाँद)

तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात 

मग आकाशातले रंग मावळतात 

फिर चांद की जगह हमें आप दिखाई देते है| 

आप को देखकर वो भी शरमा के बादलों में छुप जाता है। 


                             शेरोळी -3( परिवार)

सारे हे डाव घडीचे 

ध्यानी असावे जवळचे 

हर सपना साकार है। 

जब परिवार साथ है।

          

                           शेरोळी-4 ( इज्जत)

तुला असं काय द्यावं 

 मनात कायमच कसं रहावं 

कुछ नही बस थोडीसी इज्जत चाहते है आपके नजर में| 

वैसे भी आप ही का तो बसेरा है इस दिल में|


                             शेरोळी-5 ( प्यार)

उनाड असं कधीतरी वाटावं 

मनातल न सांगता कळावं 

बोल ने के बाद तो हर कोई समझ जाता है| 

पर बिना बोले जो समझे प्यार उस पर ही आता है|


                         शेरोळी-6 ( वक्त)

आठवणीत ही न राहता 

ती वेळ ही गेली आता 

वक्त ने क्यों ऐसी घडी दिखाई | 

ना तुम ना तुम्हारी यांदे हात आई 


                         शेरोळी-7 ( बेगाने)

समजून घ्याया गेलो होतो 

कुढत असा राहिलो होतो 

जिन्हे अपना मान के समझने चले थे | 

उनके लिए हम आज भी बेगाने थे | 


                       शेरोळी -8 ( गम )

कसं रे असं जमतं

 वेदनेत हास्य फुलतं 

यादों मे तेरी जीये जा रहे है | 

गम छुपा के अब हम मुस्कुरा रहे है | 


                          शेरोळी-9 ( ख्याब )

राहू दे त्या छान कल्पना

 नको रे आता त्या वलग्ना 

जो ख्याब तुमने दिखाया सनम माना बहुत हसीन था ।

 हमें लगा छोटासा आशियाना , पर वो तो बातों का महल था|


                            शेरोळी-10 ( प्यार)

त्यावेळी सारं माझ्याकडे होतं 

मात्र स्वतःकडे लक्ष  नव्हतं

 तुम्हारे प्यार में इस कदर खो गये | 

की जमाने को ही नही खुद को भी भूल गये |



रजनी✍️©®

1/09/21



         


   

           


Saturday, 14 August 2021

एवढचं काय ते सांगायच होतं


 

एवढचं काय ते सांगायचं होतं
समोर बसवून तुला
इश्श जे माहित आहे तुला
ते सांगू कसे हेच कळे ना मला
पूर्वीच्या काळी एक बरं होतं
भावनांना नको होती  शब्दांची साद
अबोलपणातही होता मुक्त प्रतिसाद
तसं माझं अबोल प्रेम तु आवडून घेशील ना
भांडले जरी तुझ्याशी तरी समजून घेशील ना
एवढचं काय ते सांगायच म्हणत
एक सांगायचचं राहिल,
.
.
.
.
.
.
.
.
.
" रागावते , रुसते,भांडते तुमच्याशी वरचेवरी
परी नितांत आदर आणि प्रेम दडलयं हृदयात खोलवरी"
.
.
.
.
एवढचं काय ते सांगायचं होतं
म्हणत खूप काही बोलले
काळजी करू नका मी
इतक्यात कुठे नाही चालले
पण जाण्याआधी मला हे सांगायचच होतं
जाताना स्वतःकडे काहीही ठेवायचं नव्हतं

रजनी✍️©®


Friday, 13 August 2021

सप्तरंगाची उधळण


ती वेळ छान होती
घडल्या अनेक गोष्टी
चाहुल लागता तुझी
आनंदास आली भरती
तो नवथर नऊमासाचा काळ
उदरी वाढत होतं माझ ते बाळ
उदरी जपतं होते तुला
सुंदर सुकुमार माझ्या फुला
न पाहता तुला लागला होता लळा
तव हलचालींचा मना जडला चाळा
पदस्पर्शाने तुझ्या मन आनंदले
आगमनास तव नेत्र आसुसले
आगमनाची झाली वेळ
मन झाले उतावेळ
आगमन झाले तुझे मध्यरात्री
आनंदोत्सव ते आजोबा करती
बोल बोबडे घुमले कानी
कोडकौतुक तुझे केले त्यांनी
भरून पावले ते तुझ्या येण्यानी
सार्थक झाले त्यांचे जीवनी
आजीने मग तुझे नाव सुचविले
"सार्थक " तुझे ते नामकरण झाले
खरचं ती वेळ खूप छान होती
होळीपोर्णिमेची ती तिथी होती
आगमनाने तुझ्या जीवनी आमच्या
सप्तरंगाची उधळण झाली☺️☺️❤️❤️

रजनी✍️©®

 

Saturday, 12 June 2021

शब्दसुमने



लिहायच होतं बरंच काही
पण शब्द माझ्यावर रुसले होते
अद्दल घडविण्यासाठी मला जणू
मनाच्या कोपऱ्यात दडले होते
शब्द संपत्ती ही माझी मी
वारेमाप खर्चत होते
कदर नाही अश्यांवरही
शब्दसुमने उधळित होते
जाणून मोल त्या शब्दांचे
त्यांना मी आळवित आहे
लिहायचे आहे बरेच काही
म्हणून छानसे मला सुचु दे काही

रजनी✍️

 

शब्द


 

लिहायच होतं बरंच काही
पण म्हणाव तस सुचलं नाही
पुन्हा एकदा शब्दांना माझ्या
कागदावर उमटणं रुचल नाही
डोळ्यांतुन मनात उतरण्याची
शब्दांना नव्हती खात्री
मग मीही केली नाही
त्यांच्यावर उमटण्याची जबरदस्ती
सहज सुचणार असतील अर्थपूर्ण शब्द
तरच लिहीण्यास काही अर्थ आहे
नाहीतर नुसतं यमक जुळवून केलेली
कविता ही व्यर्थ आहे.

रजनी✍️



Thursday, 10 June 2021

कातरवेळी


 

तगमग ही जीवघेणी
कातरवेळी जाणवते
दिवसाच्या संध्येला
तुझीच आठवण छळते
संधिप्रकाशात तुझीच
छबी मनी उमटते
अन आठवांनी तुझ्या
पाणी डोळा दाटते
देव्हाऱ्यात मग मी
सांजवात लावते
अन जोडूनि दोन्ही कर
तुझ्यासाठी प्रार्थना करते

रजनी✍️


आता किती वेळा सांगांयच


 

आता किती वेळा सांगायचं
सांग तुला कधी कळायचं
दरवेळी नको असते सोन्याची माळ
पण कधीतरी हौसेने तिच्या केसांत मोगरा तर माळ

आता किती वेळा सांगायचं
सांग तुला कधी कळायचं
गिफ्ट म्हणून देऊ नको चंद्र आणि तारा
पण कधीतरी आवरशील का घरातला पसारा

आता किती वेळा सांगायचं
सांग तुला कधी कळायचं
तुझ्या रूटीनसाठी तिने घड्याळाअगोदर धावायचं
पण  तिच्यासाठी मात्र तू पळभर न थांबायचं

आता किती वेळा सांगायचं
सांग तुला कधी कळायचं
तुझ्या मूडसाठी तीने सतत दक्ष रहायचं
पण तू मात्र तिच्या मूडस्विंग कडे दूर्लक्ष करायचं

आता किती वेळा सांगायचं
सांग तुला कधी कळायचं
बायको म्हणून गृहित न धरणं
हे तुला कधी जमायचं

रजनी✍️



Tuesday, 25 May 2021

मागे वळून पाहिल नाही


 

प्रेयसीच्या लग्ना गेलो
घालून रेशीम झब्बा
लग्नासाठी गर्दी तिथे
जमली होती तोबा
गर्दीमधून वाट काढत
कोपऱ्यात जाऊन बसलो
लग्न सोहळा पाहून काही
क्षण ट्रान्समध्ये गेलो
मंगलअष्टकांच्या आवाजाने
मग भानावर आलो
जड पावलांनी चालत
मग तिच्याकडे गेलो
डोळ्यांमधले अश्रु लपवित
त्यांना शुभेच्छा देऊ लागलो
.
.
.
.
.
तिच्यासाबेत लग्न करण्याच
स्वप्न माझं भंगल
मग जे राहून गेल
ते सोडून द्यायचं ठरवलं
.
.
.
.
.
.
मागे वळून ही न पहाता मग
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी थेट जेवणाच हॉल गाठलं

रजनी✍️



Friday, 21 May 2021

गाफील नको राहू


 गाफील नको राहू

प्रेमाच्या या खेळात
जीव जडवून बसशील
भावनेच्या भरात
नातं आणि व्यवहार यांची
नेहमीच होते गल्लत
व्यवहारात भावनेची
नेहमीच असते किल्लत
भावनेला नाही  महत्व
व्यवहारी या जगात
म्हणूनच गाफीलपणे
तू पडू नको प्रेमात❤️❤️

रजनी✍️




गाफील नको राहू
सर्व सावधगिरी पाळ
राहू दे हाच ध्यास
घ्यायचा आहे मोकळा श्वास

रजनी✍️



त्या वळणांवर पाऊस होता

त्या वळणावर पाऊस होता
तिच्यावर भाळलेला
प्रेमाने भरलेला
तिच्यासाठी थांबलेला
तिला ही होती भेटीची आतुरता
.
.
.
.
. पण
.
.
.
.
.
प्राक्तनात तिच्या होती प्रतिक्षा
खऱ्याखुऱ्या वसुंधरे सारखी
.
.
.
.
कारण
.
.
.
.
वळणावर त्या ती वळलीच नाही
मन आणि बुद्धीच्या युद्धात
मनाचं तिने ऐकलच नाही......

रजनी✍️




Tuesday, 11 May 2021

विरह सरता सरेना


 

विरह सरता सरेना
रात्र ही संपेना
तुझ्या वाटेकडे लागले डोळे
काही केल्या मिटेना
बैचेनी दाटे मनी
तगमग ही उठे देही
झाला वारा ही निशब्द
झाड ही मुके होई
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उन्हाळयाची उष्ण रात्र
एसी ही शांत होई
.
.
.
..
.
.
पेपरने घालून वारा
साजण ही थकून जाई😀😀😀
.
.
.
.
.
.
आतातरी तू येना " वीज( electricity)"
तुझा विरह न सहन होई😂😂


रजनी✍️



मी व माझी सौ.

 



मी व माझी सौ.
आहोत तसे खमके
पण महामारीच्या या काळात
भांडत आहोत मोजके😏😏

भांडून भांडून सांगा
जाणार आहोत कुठे
बाहेर पडलो तरी
लॉकडाऊन संपलय कुठे😠

भांडणांना देऊ या
आता थोडासा विराम
अन म्हंटल घरातच
करुया जरासा आराम☺️☺️

ऐके दिवशी रविवारी
ती खुशीत आली
तयार होऊन जरा
बाजार करते म्हणाली🙋

अंघोळ वैगेरे उरकून
घ्या नाश्ता करून
तुमचे आवडते
सॅण्डविच ठेवलेत मी करून🥪🥪

कानांवर माझ्या बसेना विश्वास
अन बाहेर जावे लागले
नाही म्हणून मी
घेतला मोकळा श्वास😘😘

थोड्याच वेळात वादळ आमचं
खुशीत घरी परतलं
अन सामान सॅनिटाईझ करून
कोपऱ्यात मांडू लागलं👩‍🍳

माझ्याकडे पाहून
छानसं हसली
दुपारच्या जेवणाला
बिर्याणी करते म्हणाली👩‍🍳🍲

नशीब आज माझं
होत भलतचे जरोवर
सौ म्हणाली अहो डोळे
मिटा बघू मी सांगेस्तोवर👀

पडत्या फळाची आज्ञा
घेऊन मी डोळे मिटले
अन
.
.
.
.
.
बिर्याणी अगोदर मैफिलीचे 
स्वप्न मन रंगवू लागले
हातात असेल एकच प्याला🍺
त्यात रमेल मी मस्त मौला🍾
.
.
.
.
.
सौ च्या आवाजाने मी डोळे उघडले
अन सौ ने हातात माझ्या
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
कपड्याच मोठ्ठ बोचके सोपवले😲😲😡
.
.
.
.
.
परवा कपाट आवरून
धुतले आहेत हे कपडे
.
.
.
.
.
बिर्याणी होईपर्यंत ह्यांना
इस्त्री करून ठेवा हो गडे😬😬
.
.
.
.
.
.
.
लॉकडाऊन म्हणून इस्त्रीवाला
काय गेला गावाला
सौ ने मला गोड बोलून
असे लावले कामाला😤😒😩😩😠😠

रजनी✍️



Monday, 26 April 2021

सांगायचं नव्हतं तुला


जाँगिंग पार्क मधे व्हायची त्याची भेट
नजरेला नजर भिडायची थेट
त्याच्याकडे पाहून डोळे माझे हसायचे
ॲटीटयुडवाली स्माईल त्याचे डोळे द्यायचे
व्यायाम करताना पाहून त्याला कसलं भारी वाटायचे
पण बोलू कसे याच्याशी मी याचाच विचार करायचे
.
.
.
.
.
. एक दिवस अचानक ती संधी चालून आली
एन्ट्री त्याची होताच मी त्याची वाट अडवली
.
.
.
.
.
. प्रश्नार्थक नजरेने त्याने माझ्याकडे पाहिले
.
.
उत्तरादाखल मी उदगारले
.
.
.
.
. सांगायचे नव्हते तुला
.
...
.
.
.
.
.
.
. पण आता सांगते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. घाईघाईत तू ट्रॅक पॅन्ट उलटीच घातलीये बहुतेक😂😂😂

रजनी✍️


 

Saturday, 24 April 2021

माझा मी न उरलो


 

माझा मी न उरलो
आले आनंदाश्रु दाटून
तुझे पहिले टॅहॅ
गेले कानी निनादून

माझा मी न उरलो
तुला कुशीत घेऊन
क्षणार्धात बाबा झालो
तुझं आगमन होऊन

माझा मी न उरलो
गेलो खूप सुखावुन
पहिली हाक ती बोबडी
ठेवली हृदयात साठवून

माझा मी न उरलो
तुझ्यासाठी जागून
कासावीस झाला जीव
तुला रडताना पाहून

माझा मी न उरलो
बोबडे बोल ऐकुन
बडबड गीत तुझे
घेतो कानांत साठवून

माझा मी न उरलो
तुझ्याशी खेळून
गुडघ्यावर घोडा होऊन
भातुकलीचा खाऊ खाऊन

माझा मी ना उरलो
तुझी प्रगति पाहून
भारावून जातो नेहमी
तुला मोठं होताना पाहून

माझा मी ना उरलो
तुझा मित्र होऊन
भूतकाळात मारली फेरी
तुझा हात हाती घेऊन

माझा मी ना उरलो
गेलो आठवणीत हरवून
पिलु मोठे होऊन आज
गेल घरटं सोडून

माझा मी ना उरलो
पण खात्री आहे मला
पिलु परतुनी येईल
अन थोडा वेळ देईल मला

माझा मी ना उरलो
अन जेव्हा गात्र ही थकतील
शेवटचे श्वास माझे तेव्हा
त्याच्या कुशीत विसावतील

रजनी✍️



Wednesday, 21 April 2021

पाऊस


 

पाऊस नसते पुस्तकातील केवळ
          एक कविता
पाऊस असते हळव्या मनाची सुंदर
             एक प्रतिमा

पाऊस  नसते उगाच कटकट अन्
            फजिती
पाऊस असते गरमागरम चहा अन्
             खमंग भजी
            
पाऊस  नसतो फक्त गार वारा अन्
           ऋतु हिरवा
पाऊस असते धुंद सरगम ,ती अन्
            तो बावरा

पाऊस  नसतो फक्त ढगांचा गडगडाट अन्
                विजांचा कडकडाट
पाऊस असतो डू लणाऱ्या शेतातील चिंब भिजलेली
                नागमोडी पायवाट
             
पाऊस म्हणजे आकाश आणि धरतीचा
             मिलनाचा क्षण
धरतीमध्ये मिसळून परि तृप्त करतो
            कण न कण

मिलनामुळे त्यांच्या सागरास ही
             येते भरती
फेसाळणाऱ्या  लाटा करतात
              गर्दी किनाऱ्यावती

रजनी✍️
              

Wednesday, 14 April 2021

विसरून भान सारे


 

लव्ह ॲट फर्स्ट साइट
असे ही काही असतं❤️❤️
त्याला पाहिल नसतं तर
मला हे कधीच पटलं नसतं☺️☺️
यथावकाश ओळख होऊन
आमची मैत्री झाली
प्रेमाच्या दिशेने मग मी
वाटचाल सुरु केली☺️☺️
.
.
.
.
. अश्याच एका संध्याकाळी
बागेत भेट ठरवली
.
.
.
.
. नेमके काय बोलायचे याची
मनांत उजळणी केली☺️☺️
.
.
.
.
.
भेटताच त्याला विसरून भान सारे
लाजत मुरडत प्रेमाची कबुली दिली☺️☺️☺️
.
.
.
.
.
. अन त्याच्या उत्तराची आतुरतेने
   वाट पाहू लागली
.
.
.
.
.
.
.
..
..
...
.
.
.
.
. कानांमधून इअरफोन काढून तो बोलला,
" हं आता बोल  तू काय बोलत होतीस"?🤦🤦🥺🥺
.
.
.
.
.

रजनी✍️



Sunday, 11 April 2021

थोडं तुझं थोडं माझं


 

तुझी चुल माझं उलाथणं
माझं पोळपाट तुझं लाटणं
अंगणात भातुकली मांडायचो
थोडं तुझं थोडं माझं
तासनतास खेळात रमायचो......

तुझे कुरमुरे माझे फुटाणे
माझा गुळ तुझे दाणे
छोटे छोटे लाडू वळायचो
थोडं तुझं थोडं माझं
तासनतास खेळात रमायचो.......

तुझी बॅट माझा बॉल
माझं रॅकेट तुझं फुल
अंगणात सामने रंगवायचो
थोडं तुझं थोडं माझं
तासनतास खेळात रमायचो.......

गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी
नाही उरल अंगण अन ती भातुकली....

थोडं तुझं थोडं माझं चा जमाना
आमच्याबरोबरच जुना झाला
तू तुझं मी माझं चा
हा नवीनच काळ आला.....

टी टी एम एम करत करत
खेळण्यांचे ढीग लागले
पण खेळात रमायचे तेवढे मात्र राहीले
पण खेळात रमायचे तेवढे मात्र राहीले.......

रजनी✍️

            



Friday, 9 April 2021

ठरवून काही होत नाही


 

                    कविता

ठरवून फक्त पत्रिका जुळतात
मन  नाही जुळत
जुळलेच कधी छत्तीस गुण
तरीही त्यांचे  नाही पटत
मनोमिलन आपोआप घडत
ठरवून काही होत नाही
गुणमेलन कितीही केले तरी
शेवटी संसार सुखी होत नाही...........


                      चारोळ्या

                      ठरवून होत नाही

ठरवून होत नाही
भेट दोन जीवांची
भिडताच नजर दोघांची
ठाव घेते हृदयाची

                           ठरवून होत नाही

ठरवून ही होत नाही
निर्णय तुला विसरण्याचा
माहित आहे ना तुला
तू प्राण आहेस माझा


रजनी✍️

Sunday, 4 April 2021

आठवणी करती पाठलाग


 

आठवणी करती पाठलाग
खेळतात पाठशिवणीचा खेळ
येण्याची त्यांच्या कधी ही
ठरतेली नसते वेळ
वेळी अवेळी येवून
मनात करतात गर्दी
अवचितच येतात कधीही
न देताच वर्दी
त्यांच्याबरोबर खेळताना
नेहमीच माझ्यावर राज्य येते
दूरवर त्यांच्या मागे धावण्यात
माझी मात्र दमछाक होते
धप्पा करत एक एक
मनावर थाप  देतात
अन माझ्यावर राज्य टाकून
खेळामध्ये  रमतात

रजनी✍️



Saturday, 3 April 2021

हे असचं चालायचं


 

कसे समजावू स्वतःला
हे असंच चालायचं
तुला शब्दांची ओढ
तर त्याच मौन असायचं
त्याच्यासाठी तुझ्या शब्दांनी
झरा होऊन खळखळायच
अन त्याच्या शब्दांना मात्र
तु दवबिंदुपरी टिपायचं

रजनी✍️

कसे समजावू स्वतःला


 

कसे  समजावू स्वतःला
हे असंच चालायच
कितीही समजावल मनाला
तरी मन अस्वस्थ व्हायचं
इतरांच्या कमेंटस आठवून
मन पेटून उठायचं
मग काहितरी ठरवून
मन हलक हलक व्हायचं
त्या दिवशी मात्र खूप व्रतस्थ रहायचं
घेतला वसा टाकू नको
हेच दिवसभर मनांत घोळवायचं
संध्याकाळी मग घराबाहेर पडायचं
खूप लांबवर फिरायल जायचं
फिरुन येताना पायाने
नेहमीच्या ठिकाणी वळायचं
मग मनानेही आपलं
व्रताच हत्यार टाकायंच
अन
.
.
.
.
समोरच्याला सांगायच,
.
.
.
.
" सबसे पेहले एक प्लेट हमेशावाल तिखा पानीपुरी बनाओ इसके बाद दो प्लेट शेवपुरी मस्त शेव मारके पार्सल और लास्ट में एक चटपटी दही पुरी."
.
.
.
.
.
आता एवढ सगळ झाल्यावर
डिनरचा विचार करायचं
.
.
.
..
मग काहितरी लाइट खाऊया
म्हणून सॅण्डविच च सामान घेऊन घरी यायचं
.
.
.
.
.
वसा -बिसा उद्या बघू म्हणूत
डिनरला येथेच्छ सॅण्डविच खायचं
.
.
.
.
.
अन
.
.
.
.
तृप्त मन आणि वाढलेल्या कॅलरिज सोबत .
शांतपणे झोपून जायचं
.
.
.
.
रजनी✍️



Friday, 2 April 2021

चाहू ल ( अति लघुकथा )

 

आजची दुपार तिच्यासाठी नेहमीची नव्हती. ती खूप अस्वस्थ होती आणि याचे नेमके कारण तिलाही कळत नव्हते. त्यामुळे तिची चिडचिड होत होती. थोडा वेळ खिडकीत बसून वेळ काढावा म्हंटली तर बाहेर हा सूर्य तापलेला. त्या रखरखीत उन्हाची काहिली जणू तिच्या विचारांच्या काहिलीत मिसळली होती. पडदे परत सरकावून तिने पंखा वाढवला व तशीच बेडवर बसून राहिली. मनातले उलट सुलट विचार आणि अस्वस्थपणा काही कमी होत नव्हता. काय करावे या विचारातच तिने तिचे आवडते पुस्तक हातात घेऊन वाचायच ठरवल पण
आज तिचा कशातही सुर लागत नव्हता अगदी पाचव्या मिनिटाला ते पुस्तक मिटून ती हॉलमध्ये आली.
            थोडा वेळ टीव्ही लावून मनोरंजन करावं म्हंटल तर त्याच रटाळ मालिका , रिॲलिटी शो च्या नावाखाली अतिरंजित ड्रामा अन प्रत्येक चॅनलवर सारख्या बातम्या. दुसऱ्या क्षणाला तिने टीव्ही बंद केला. ती किचन मध्ये गेली थंड पाण्याची बाटली बाहेर काढून ग्लॉस मध्ये ओतून  तिच्या आवडीच सरबत तयार केल आणि सोफ्यावर विसावली.
             पण काही केल्या तिला स्वस्थ वाटत नव्हते. एक वेगळीच बैचेनी तिला जाणवत होती. आता मात्रा या अस्वस्थ पणामुळे विचारांमुळे ती रडवेली झाली. फोन करून कुणाशीतरी बोलाव असा एक विचार आला पण तिने तो तसाच मागे सारला आणि डोळे मिटून बसून राहिली.
           अचानक जोरजोरात वारे वाहू लागले, खिडकीचे पडदे त्या वाऱ्याबरोबर हेलकावे खाऊ लागले . मृदगंध दरवळू लागला आणि हलकेच चाहू ल देते पाऊस सुरु झाला. ती पुन्हा खिडकीत आली आणि हळुहळु तीची अस्वस्थता त्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली.

रजनी✍️



हवा विसावा क्षणभर

                        हवा विसावा क्षणभर

हवा विसावा क्षणभर
मोकळा श्वास घेण्यासाठी
धावपळ आहेच नाशिबी
इथे जगण्यासाठी

हवा विसावा क्षणभर
अंतमुख होण्यासाठी
स्वतः ची प्रतिमा स्वतः
अंतरावरुन पहाण्यासाठी

हवा विसावा क्षणभर
मुखवटे उतरवण्यासाठी
त्यांच्याशिवाय मोकळा
श्वास भरभरून घेण्यासाठी

हवा विसावा क्षणभर
निर्सगाकडे बघण्यासाठी
दातृत्व काय असते
ते त्याच्याकडून शिकण्यासाठी

                             मिठी

हवा विसावा क्षणभर
धुंद तुझ्या मिठीत
स्वतःला विसरून
रमण्या तुझ्या आठवणीत

रजनी✍️


चारोळ्या


 

                             किनारा

किनारा दरवेळी देत नाही
फक्त मर्यादांच भान
कुणासाठी तरी असतो तो
हक्काच विसाव्याच स्थान


                             असावी सोबतीला शांतता

असावी सोबतीला शांतता
इथ प्रत्येकाला वाटत
पण तिच्या शोधार्थ जग
एकांतपेक्षा गर्दीतच जास्त  फिरत

                         पूरे तुझे बहाणे

पुरे तुझे बहाणे
ते लटके रागावणे
माझी नजर पडताच
हलकेचं नजर चोरणे

                     जपून ठेव सारे

जपून ठेव सारे म्हणत
तूच उधळून लावलं
तुझ्यावर प्रेम केलं
हेच का माझे चुकलं

                          

रजनी✍️ 


Thursday, 1 April 2021

सोबत



मी किनाऱ्यावर रेगांळणारी
अन तुला ओढ सागराची
विश्वासाने झोकुन दे स्वतःला
मला खात्री आहे तुझ्या परतण्याची☺️
सहप्रवासी भेटतील  ही वाटेत
मला ही अन तुला ही
काही काळ सोबत करण्यासाठी
पण शेवटी सोबत असेल फक्त एकमेकांची
मला ही अन तुला ही☺️


रजनी✍️

Monday, 29 March 2021

एवढंच काय ते मागणे

                         




एवढच काय ते मागणे


एवढेच काय ते मागणे
मी कधीच म्हणत नाही....
कारण मागण्यांची यादी माझी
काही केल्या संपत नाही....
एक मात्र बर आहे
माझ्या मागण्या पूर्ण होतात
हे ही तितकेच खरं आहे.....
तुझी कृपा देवा अशीच राहूदे.....
अन चालता बोलता हा देह
तुझ्या चरणी विलीन होउ दे......


                         एवढच काय ते मागणे


तो एक क्षण होता
जेव्हा तुलाच काय पण
मलाही माझे अस्तित्व नको होते......
हा एक क्षण आहे
माझं अस्तित्व आजही आहे
सोबत तुझी साथ ही तशीच आहे......
आता एवढेच काय ते मागणे आहे
माझे अस्तित्व असले नसले तरीही
तुझी साथ ही अशीच राहू दे.........

रजनी✍️



Friday, 26 March 2021

सांगायच राहून गेल



बाजारात फिरताना तो नजरेस पडला
अन मला वाटल माझा शोध पूर्ण झाला
स्टायलिश त्याच्या दिसण्यावर मी लगेच भाळले
अन तो उभा असलेत्या स्टोर मध्ये शिरले
संवाद सुरु करायचा म्हणून मी त्याला विचारले
.
.
.
स्कार्फ सेक्शन हेच का?
.
..
. होकारार्थी मान डोलावून त्याने उत्तर दिले
.
.
.
. स्कार्फ निवडीचे केले मी बहाणे
चोर नजरेने होते फक्त त्यालाच पहाणे
.
.
.
.
वाटल होत आज नशीब आहे जोरावर
पण कशाच काय आईचा सारखा कॉल येत होता फोनवर
.
.
.
एक स्कार्फ निवडून मी काऊंटर कडे वळले
आणि
.
.
.
.
त्याचा भारदस्त आवाजाने पाठमोरी वळले
.
.
.
.
"एक मिनिट मॅडम "
.
.
.
.
आवाजासरशी त्या मी फोन स्वीच ऑफ केला
आणि त्याच्याकडे पाहून एक हसरा कटाक्ष दिला
.
.
.
एक सांगायचे राहिले आहे
.
.
.
.
तुमच्या हातातल्या स्कार्फला अगोदरच माझ्या बायकोने निवडलेले आहे.😀😀
.
.
.
.
.( तुला तर निवडलच अन् स्कार्फ पण निवडला)😡😡😡🥺 मुक्त स्वगत पुटपुटत मी स्कार्फ परत केला.
.
.
.
.
अन शोध मोहिमेचा मोर्चा दुसऱ्या दुकानात वळवला
😀😀😀😀😀😀

रजनी✍️


 

Wednesday, 24 March 2021

सांगायच राहून गेल

                    सांगायच राहून गेल


सांगायचे राहून गेल म्हणत म्हणत
ती एक दिवस मला नक्की सांगणार
मी ही ह्या दिवसाची किती वाट पाहिली
हे तिला खर खर सांगणार


                      सांगायच राहून गेल


सांगायचे राहून गेले
तरी तुला ते कळते
एकरूप या नात्याला
मौनाची ही भाषा कळते


                     सांगायच राहून गेल

सांगायचे राहून गेले म्हणता म्हणता
त्याला एक दिवस सांगितले
मग काय होणार मंडळी
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे पेन परत मागितले

तुम्हांला काय वाटल मंडळी .....😀😀😀😀


रजनी✍️

सांगायच राहून गेल


 

तुझी माझी मैत्री सहजच जमून आली
नंतर मात्र आपण दोघांनीही ती टिकविली
तुझ माहित नाही पण तु मला आवडायची
मनातल्या माझ्या प्रतिमेशी तुझी छबी जुळायची
अशातच एक दिवस तुझ्या घरचा निरोप आला
किती दिवस झाले तु घरी नाही आला......
निरोप ऐकुन स्वारी मग भलतीच खुश झाली
मनामध्ये मग सारख गाण गुणगुण लागली
.
.
.
.
.( शायद मेरी शादी का ख्याल दिल मे आया है इसिलिए उसके आई ने मुझे चाय पे बुलाया है)☺️☺️☺️
.
..
.
.
.
नटून थटून स्वारी तिच्या घरी गेली
आईनेही स्वागताची जंगी तयारी होती केली
त्यादिवशी त्याला आई भावी सासू वाटली
चहापाणी गप्पाटप्पा मिठाई पण खाउन झाली
आठवल्या सारखे करत तीची आई बोलली
.
.
..
.
.
एक सांगायच राहून गेलं बाळ
.
.
.
.
.
प्राण कानांत आणून मी ऐकु लागलो
.
.
.
.

अरे व्याह्यांनी विचारलयं कानपिळीसाठी मुलीच्या भावाला घड्याळं हवय की ड्रेस हवा🥺😀😀😀

.😀😀😀
.
.
.
रजनी✍️



Tuesday, 23 March 2021

शोधून सापडले नाही

                  शोधून सापडले नाही

शोधून सापडले नाही
तिज अस्तित्व तीचे अखंड
नात्यात गुंतुन सगळ्या
जणू ते दुभंगले आहे
शोधून सापडले नाही
अदृश्य ते साखळदंड
भासते ती मुक्त परि
जणू ते जखडले आहे
शोधून सापडले नाही
अवकाश तिज स्वतःचे
परि न डगमगता ही ती
ते शोधण्या सज्ज आहे

रजनी✍️

Sunday, 21 March 2021

का हा अट्टाहास

                           का हा अट्टाहास

का हा अट्टाहास
तुझीच होऊन रहाण्याचा
तुझ्या सोबत नसतानाही
तुझ्या मध्ये असण्याचा


                       का हा अट्टाहास

का हा अट्टाहास
मला विसरण्याचा
व्यर्थ प्रयत्न तो
श्वासाविना जगण्याचा


                       का हा अट्टाहास

का हा अट्टाहास
तिला गर्भातच मारण्याचा
पर्याय आहे का तुझ्याकडे दूसरा
तुझा वंश वाढवण्याचा

का हा अट्टाहास
तिला गृहीत धरण्याचा
ती ही एक माणूस आहे
हे सोयीस्कर पणे विसरण्याचा

का हा अट्टाहास
तिच्या भावना दडपण्याचा
हिम्मत आहे का तुझ्यात
त्यांचा उद्रेक थोपवण्याचा

का हा अट्टाहास
तिला कमी लेखण्याचा
कुठले क्षेत्र उरले सांग
तिने तिच्या कक्षा रुंदावण्याच्या

रजनी✍️



पहिला आनंदोत्सव


 

" दोन लेकींच्या वडिलांनी
मनःपूर्वक आनंदोत्सव साजरा केला
जेव्हा त्यांच्या लेकीने त्या रात्री
एका मुलाला जन्म दिला "

आजकाल मुलगा आणि मुलगी भेद करणे बऱ्याच प्रमाणात कमी झालय. पण ८० - ९० च्या काळातही हा भेद केला जायचा. माझी आजी म्हणजे वडिलाची आई या विचारांची होती. माझ्या वडिलांवर आजीचा विशेष जीव होता पण आजीच्या दुर्देवाने माझ्या वडिलांना दोन्ही अपत्ये मूलीच झाल्या. त्यामुळे आजी ला खूप वाईट वाटले. वडिलांनी कधी आजीला दुखावले नाही पण आमचाही खूप लाड केला. चांगले संगोपन केले उत्तम शिक्षण दिले.
            माझ्या लग्नानंतर 21 मार्च 2008 ला जेव्हा मला पहिला मूलगा झाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते स्वभावाने हळवे असल्याने घरी थांबले होते , रात्री एक वाजता आईने दवाखान्यातून फोन करून ही बातमी त्यांना सांगितली तेव्हा, त्यांना इतका आनंद झाला की, एवढ्या रात्री जवळजवळ सगळ्या नातेवाईकांना फोन करुन त्यांनी हि बातमी कळविली. अर्थात हा तपशील मला नंतर समजला.
             नंतर ही बाळाच्या संगोपनात त्यांनी आनंदाने सहभाग घेतला. त्यावेळी कडक उन्हाळा होता तर त्याचा बाळाला त्रास होउ नये म्हणून स्वतः गंध गोळी उगाळून त्याला लावायचे. दुपारी मला झोप मिळावी म्हणून तास- दोन तास त्याला खेळवायचे. मी जेवत असताना त्याला घेऊन फिरवायचे . यथा अवकाश थाटात त्याचं बारस ही त्यांनी केलं आणि  आई ने त्याचे नावही खूप छान सुचविले "सार्थक".
          सार्थक च्या आगमनाने त्यांना आनंदोत्सव साजरा करता आला म्हणतात ना दुधापेक्षा दुधावरची साय खूप च महत्वाची आणि प्रिय  असते.


रजनी✍️


                      



जागतिक कविता दिन २१ मार्च


 


आज २१ मार्च जागतिक कविता दिन " या दिनाच्या निम्मिताने सुचलेली ही शीघ्र कविता खास या व्यासपीठावरिल माझ्या सर्व कवी मित्र व मैत्रिनींन साठी तसचे नेहमी चांगले समीक्षण व अभिप्राय देऊन मला प्रोत्साहन दे णाऱ्या वाचकांसाठी .

                    कविता


कधी कधी ती अवचित येते
क्षणात मनात तरळुन जाते
जाता जाता शब्दखुणा त्या
हलकेच मागे ठेवून जाते
बोट धरुनि त्या शब्दांचे
कवितेच्या मी गावी जाते
आळविता तिज निवांत मी
कविता माझ्यावर प्रसन्न होते
प्रसन्न होऊनी वरदानस्वरुप मग
रसिक वाचकांची कौतुकभरली थाप देते.

रजनी✍️



भावविभोर


 


नऊ महिने नऊ दिवस
बीज उदरात जपले
वेळ भरताच परी
कळी होऊन अंकुरले
त्या कळीच्या आगमनाने
अंगण माझे फुलले
त्या गोंडस बाललीलांनी
घरदार अवघे दुमदुमले
बोबडे बोल मग ते घुमले
ऐकुन माझे कान सुखावले
लुटुपुटीची भातुकली
बाहुलीचे लग्न , अन सागरगोटी
नीत नवीन खेळ खेळुनि
बाहुली माझी होई मोठी
क्षणार्धात लोटला केवढा काळ
वरपरिक्षेची ती आली वेळ
घटका भरताच नववधू झाली
बाहुली माझी बोहल्यावर चढली
भावविभोर हे दृश्य असे
स्वप्नवत वाटे मजला सारे
पाठवणी करता आज आठवे
बाहुलीचे माझ्या गोंडस रुपडे

रजनी✍️



मनासारखा एक दिवस


 

तो आणि ती एक सुंदर जोडप. लग्नाला एक तप पूर्ण करून  नात्यात स्थिरावलेल. हे एक तप पूर्ण करता करता हळुहळु  वय ही वाढू लागलेल . आता काही नवे नवलाईचे दिवस नाही आयुष्याने बऱ्यापैकी गति पकडलेली अशी अवस्था. संसार आणि या संसारवेलीवर फुललेली दोन गोंडस फुले. त्यांच्याकडे आणि घरातील जेष्ठांकडे बघता बघता तीचे दिवस धावत होते अन या सर्वांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी तो घरापासून लांब राबत होता.
                     नात्यात प्रेम आणि आदर तर होताच पण काहीतरी कमी आहे अशी जाणिव तीला वारंवार व्हायची कदाचित त्यालाही होत असेल पण या बाबतीत कधी तिने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला नाही. इकडे त्याला ही तिच्यातील बदल जाणवत होते पण कसं बोलाव हे त्यालाही कळत नव्हते. त्याच्या नेहमी सोबत नसण्याने तीची कधीकधी होणारी दमछाक त्यात  बदलत्या जीवनशैली मुळे आणि वाढणाऱ्या वयामुळे हळुहळु डोक वर काढू लागलेले त्रास सगळे त्याला जाणवत होते.
               अशातच एक दिवस नेहमीप्रमाणे तो वीक एंड ला आला. त्याचा मूड बघून ती बोलली "बस झाली धावपळ उद्याचा दिवस जरा आपण दोघेच आपल्या मनाने घालवू या का?" तिचे बोलणे ऐकुन त्याचे डोळे चमकले तो तिचा हात हातात घेऊन बोलला ठीक आहे तर," उद्या चा सगळा दिवस आपण आपल्या मनासारख करु." ती खूप खुश झाली आणि त्याच्या मिठीत शांतपणे झोपूनही गेली.
             तो तिला थोपटत विचार करत होता, उद्या नेमक काय करता येईल. विचार करता करता त्याला काही गोष्टी सुचल्या अन तो ही निवांतपणे झोपी गेला. दुसस्या दिवशी तो तिच्या आधी उठला, नंतर तिला हलकेच उठवून तयार व्हायला सांगितले . तिचे मात्र प्रश्नांवर प्रश्न सुर होते, त्याने तिचा हात हातात घेतला त्याच्या त्या स्पशाने ती शांत झाली सांगितल्या प्रमाणे तयार होऊन आली.
                तो आवरुन तिची वाट बघत होताच , नंतर दोघे ही कार मध्ये बसले व त्याने कार सुरु केली. तिचे प्रश्न इथे ही सुरुच होते पण त्याने दूर्लक्ष केले. थोड्याच वेळात त्यांची कार एका हॉस्पिटल समोर थांबली. हॉस्पिटल बघताच ती ने परत त्याच्यावर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.
                 तिला खूर्चीवर बसवून तो आत निघून गेला. तो उत्तर न देता गेला  म्हणून मनातल्या मनांत पुटपुटली कुठुन बुद्धी झाली अन ह्याच्याकडे ह्याच्या विश्रांतीचा एक दिवस मागितला,घेऊन नेमक आला तर  कुठे इथे हॉस्पीटल मध्ये सकाळपासून साधा चहा सुद्धा दिला नाही. त्याने करायचा तर दूर पण मलाही करु दिला नाही. तीची खूप चिडचिड होऊ लागली.
                  थोड्याच वेळात तिथे एक नर्स आली व तिला आत घेउन जाऊ लागली, आता मात्र तिला चुप बसवेना ती त्याच्याकडे पाहून बोलली हे काय आहे सांगशील का? एक दिवस मागितला तुला तर हॉस्पिटल दाखवलंस. तिच बोलण ऐकुन त्याने एक मंद स्मित केलं आणि तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे पहात राहिला.
त्याचं अस वागण बघून ती अधिकच चिडली अन तिथून जाऊ लागली.
                 तिला अडवत तो बोलला  चाळिसाव्या वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा समज. आज आपण इथे तुझे पूर्ण बॉडी चेकअप साठी आलो आहोत. हे ऐकुन तिचा तिच्या कानांव 'र विश्वासच बसेना. ती पुढे काही बोलणार एवढ्यात तिला अडवत तो बोलला, मला माहित आहे माझी बायको माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे पण ती अजून स्ट्रॉग व्हावी म्हणून मी आज तिला इथे घेऊन आलो आहे.
                   हे ऐकुन  तीला आनंद झाला त्याही पेक्षा जास्त  आश्चर्य वाटले आणि  त्याच तिच्यावरच प्रेम बघून तिला गहिवरुन पण आलं. "पण हे सर्व तु जमवल कस..?" तो बोलला," काल मला सांगून तू तर लवकर झोपलीस पण मला झोप येईना मग आठवल तू हल्ली सारख डोके दुखीची तक्रार करते , म्हणून मग मी आपले फॅमिली डॉक्टर व माझी एक डॉक्टर मैत्रीण यांना whatsapp केल आणि त्यांच्या मदतीने आज तुझ्यासाठी हे प्लान केल".
             मला खात्री होती तुला सांगितल असंत तर तू काही ना काही कारण सांगून टाळल असंत. ह्यावर काय बोलावे हे तिला खरच सुचेनास झाल होत. तिने त्याचा हात हातात घेतला व प्रेमभराने दाबला. त्याने न बोलता नेहमीसारख स्मित केल. तेवढ्यात त्या नर्स च्या परत येण्याने त्यांची समाधी अवस्था भंग पावली व ती त्या नर्स च्या मागे चालू लागली.

रजनी✍️



चारोळ्या

                         आठवण

काहूर मनी सांजवेळी
त्या माऊलीच्या दाटते
अन सीमेवर तैनात लेकराची
आठवण उरी दाटते


                          प्रतिक्षा

ओल्या सांजवेळी
काहूर मनी दाटते
तुझ्या प्रतिक्षेत साजणा
वेळ ही जणू थांबते


            .          प्रतिक्षा

काहूर मनी उठले सांजवेळी
झाकोळला आसमंत
तव प्रतीक्षेत साजणा
गडद झाला एकांत


                       सहजीवन

शिलगावित शल्य सारे
सरून गेलेल्या वर्षांचे
सोबतीने आपल्या प्रेमाच्या
स्वागत करु पुढील सहजीवनाचे


                       आस्वाद

तो चित्ती येता चलबिल मनी होते
मनासहीत शरीर मग त्याच्याकडे धावते
पाहून त्यासं असा डोळ्यांचे पारणे फिटते
अन नेत्र मिटून मी त्याचा आस्वाद घेते.......( माझा आवडता समोसा)😀😀😀😀😀


                      अल्लड

अल्लडपणे ती त्याच्या
मिठीत शिरायची
मग त्याची हृदय स्पंदने
पण तिच्या नावाने झंकारायची☺️


                      मदत

बदलत्या काळाने या
केला आहे घात
आजकाल कुणी सहज पुढे
करत नाही मदतीचा हात

                      टेक्नोसॅव्ही युग

टेक्नोसॅव्ही या युगात
माणुसकी ने प्राण सोडला
जेव्हा घटना स्थळी जमलेल्यांचा
हात मदती ऐवजी मोबाईलमध्ये गुंतला



रजनी✍️

Friday, 19 March 2021

काहूर मनी सांजवेळी


 

हल्ली याच वागणं खूपच विचित्र झालय . एवढ कसलं काम करतोय सतत फोनवर. वर्क फ्रॉम होम म्हणजे काय वाटल याला सारखच बेडरूम मध्ये कैद समोर तो लैपटॉप  अन कानाशी फोन. काही बोलायला जाव तर नेहमी यांच विडिओ कॉन्फरन्स किवा टीम सोबत ऑनलाईन मिंटीग . खूप झाल आता संध्याकाळचे सात वाजून गेले आजतर शनिवार पण आहे तरीही हा ऑनलाईन अन मी इथे बीनलाईन .
                 उलटसुलट विचारांच अन प्रश्नांच काहूर तिच्या डोक्यात सुरु होत. समोर टीव्ही नुसताच सुरु होता आणि हीचाआवडीचा कार्यक्रम असूनही तीच लक्ष नव्हंत. तेवढ्यात फोन वाजला आणि कॉलर नेम बघून भुवया ताणल्या गेल्या. ह्याची स्टायलिश मैत्रीण अन मला का फोन करतेय? तिने नाखुशीने फोन उचलला आणि संभाषण सुरु केलं. फोन झाल्यावर परत हि चे विचार सुरु झाले. एवढं कसलं महत्वाच काम आहे की त्याचा फोन लागला नाही म्हणून हीने मला फोन केला.
                  इथे मला द्यायला वेळ नाही पण हिच्याशी काहीतरी गुलुगुलु सु रु असंत सारख विचारायला गेल तर बोलतो तिचा काहितरी प्राब्लेम आहे नंतर सांगेन. अरे पण हिचा प्राब्लेम त्याचा त्रास तुला का तर बोलतो कसा ," मैत्री आहे एवढ्या वर्षांची कराव लागत गं." अत्यंत निरागस चेहरा करुन तो हे बोलतो मग हिला काहीच बोलता येत नाही. हीची खूप चिडचिड होते.
                     उद्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे हे तरी लक्षात आहे का त्याच्या ती मनातल्या मनात तडफडत होती. टीव्ही बंद करून ती स्वयंपाक घरात गेली अन स्वयंपाकाला लागली. रात्री जेवण वैगेर आवरुन बेडरुम मध्ये गेल्यावर बघते तर काय हा चक्क झोपलेला.
ती पुन्हा एकदा हिरमुसली, अन विचारांच काहूर डोक्यात घेऊनच झोपी गेली .
                   रात्री बारा वाजता त्यांच्या घराची बेल वाजली पण हा ढीम्म हलला नाही. ती रागाने याला बडबडतच  उठली कोण आलं असेल ह्या विचारात दरवाजा उघडायला गेली. दार उघडताच काय आश्चर्य त्याची मैत्रिणी. हि खर तर खूप चिडली होती पण नॉर्मली होत तीने तिला घरात घेतल, तिच्या हातातले केक चे पार्सल बघून हि च्या कपाळावरच्या आठ्या गेल्या अन तिला थोडस आश्चर्यच वाटून गेल.
               बेडरूम मधून बाहेर येत त्याने तिला विश केलं. तीला खूप गहिवरून आलं. मैत्रिणीच्या साक्षीने त्यांनी केक कापला अन एकमेकांना भरवला." बाकी सगळं मी गेल्यावर करा हं" अस  बोलून हसत हसत मैत्रिणी निघून गेली. ती निघून गेल्यावर हिने सर्वप्रथम त्याच्या मिठीत शिरत त्याची माफी मागितली. तिला त्याच प्रेम बघून खूप गहिवरुन आलं होत, तिच्या गालावर ओघळलेले अश्रु पुसत त्याने त्याची मिठी अधिकच घट्ट केली .
                 खूप छान सुखद आश्चर्याचा धक्का दिला तू मला आणि मी, तिला थांबवत तो बोलला " मॅडम खरं सरप्राईज तर आता आहे." तिला डोळे बंद करायला सांगून तो आत गेला अन एक मोठा बॉक्स घेऊन आला. हे गिफ्ट माझ्याकडून खास माझ्या प्रिये साठी. मोठ्या प्रेमाने त्याने तो बॉक्स दिला आणि एखाद्या लहान मुलीसारख ती तो बॉक्स उघडू लागली. तो प्रेमळ आणि कौतुकभरल्या नजरेने तिच्याकडे बघत होता. बॉक्स उघताच आत दहा छोटे छोटे गिफ्ट रॅप वस्तू होत्या. हे बघून तीचे डोळे विस्फारले गेले आणि मोठे आणि रेखीव डोळे अजुनच मोठे दिसू लागले. तिच्या डोळयांत बघून तो बोलला दहा वर्ष झाले ना तर दहा छोटे से गिफ्ट माझ्याकडून, आवडल का माझ सरप्राईज.
                      हो खूप आवडल मला खरतर माझ्याकडे शब्दच नाहीत व्यक्त व्हायला म्हणत तिने त्याच्या गालावर किस केलं व त्याच्या मिठीत शिरुन आपल्या आनंदाश्रुना वाट मोकळी केली😭.

रजनी✍️
                    


Thursday, 18 March 2021

मनासारखा एक दिवस

                     मनासारखा एक दिवस

मनासारखा एक दिवस घालवायच ठरवलं
स्वतःच्या आवडीच करायच ठरवलं
त्यासाठी फतवा काढायचं ठरवलं
घरच्यांच्या प्रतिक्रिया टाळायच ठरवलं
स्वतःच्या मनासारखं करायच ठरवलं
किचन ला कुलुप लावायच ठरवलं
पुस्तकांना कपाटातून काढायचं ठरवलं
त्यांच्यावरची धूळ झटकायच ठरवलं
आवडीच्या पुस्तकात रमायच ठरवलं
.
.
.
..
.
.
.
विचाराने नुसतं उत्साहाच वार संचारल
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण
.
.
.
.
.
.
.
वाजणाऱ्या अर्लाम ने त्यावर विरजण फिरवलं
.
.
.
.
.
.
.
.
.
अन् सुंदर असं माझं स्वप्न टाकीच्या  पाण्यात ओव्हर फ्लो झालं😀😀😀


                            मनासारखा एक दिवस 

मनासारख एक दिवस
खरचं जगून बघा
अन स्वतःचा अवकाश
शोधून तर पहा


रजनी✍️

Tuesday, 16 March 2021

शब्दावाचून कळले सारे

                     शब्दावाचून कळले सारे

नकळत जुळलेल्या तुझ्या
माझ्या प्रेमाची परिभाषा
म्हणजे शब्दांच्या पलिकडली
आपली ही समंजस मौनाची भाषा


                       शब्दावाचून कळले सारे


ती परी अस्मानीची
कॉलेजमध्ये अवतरली
बघताच तिला माझी तर
मतीच गुंग झाली
फ्रेर्शस आहेस का?
म्हणून मी विचारणा केली
अन स्मित हास्य देऊन
त्यावर  संमती तिने दिली
सिनिअर आहे मी तुझा
म्हणून मी ही फुशारकी मारली
अन मला प्रपोज करून दाखव
म्हणून ऑर्डर सोडली
.
.
.
.
.
.
डोळ्यासमोर आयकार्ड नाचवत ती गाली हसली
अन शब्द ही न बोलता डौलात चालती झाली
.
.
.
.
. शब्दावाचून कळले होते भविष्य पुढच्या क्षणाचे
.
.
..
.
.
.
.
कारण
.
.
.
.
.
हे गोंडस फुलपाखर होतं अपत्य आमच्या आदरणीय (खडूस) प्रिन्सिपॉलचे😀😀😀😀

रजनी✍️



अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...