काय सांगू मंडळी
कसा चमत्कार झाला
अन अहों ना माझ्या
अचानक साक्षात्कार झाला
बायकोला ही मन असतं
याची आली बहुतेक प्रचिती
अन कशी काय अचानक
ही जादू घडली
लाडात येऊन अहो म्हणाले,
एका दिवसाच्या बर्थ डे पार्टीच
काय घेऊन बसली
आपण बर्थ डे वीक साजरा करू
मस्तपैकी बाहेरगावी नाहीतर
देवदर्शनाला जाऊ
पण त्या अगोदर बर्थ डे गिफ्ट म्हणून
छानश्या साड्या तुला घेऊ
पडत्या फळाची आज्ञा घेऊन
मी लिस्ट बनवली अन
भरगच्च कपाटात माझ्या
नवीन साड्यांसाठी कशीबशी जागा बनवली
दुसऱ्यादिवशी ह्यांच्यासोबत साड्या घ्यायला गेले
एकीकडे जॉर्जेट,शिफॉन,नारायण पेठ,अन इरकल
तर दुसरीकडे कांजीवरम,पाटलीपल्लू बरेच प्रकार घेऊन
शेवटी पैठणीवर डोळे खिळले........
आहोंची संमति मिळताच जवळजवळ तरंगतच
मी काउंटरवर गेले.........
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अलार्मच्या आवाजाने डोळे माझे उघडले
पहाटेचे स्वप्न माझे आता होते सरले
आणि वाढदिवसाला पैठणी घ्यायचे स्वप्न
होते धुक्यासारखे विरले😔😔
🍁🍂🌿🍂🌿🍁🍂🌿🍁🍂🌿🍁🍂🌿
रजनी✍️
11/10/21
15 comments:
शेवट भारीच हा...एक मीनीट मन हरवल होतं तुमच्या स्वप्नात...छान वाटत होत वाचताना...पण..स्वप्नंच निघाल शेवटी...अप्रतीम लेखनशैली😅👌👍💐🍫
व्वाऽ...☝️
रजनी जीऽ...!
क्या बात है....!!... छान लिखाण..👌
खूपच छान रंगतदार आणि शेवट तर ...लई भारी👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏
खुपच सुंदर
अतिशय सुंदर व सुरेख...
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर लिहिले आहे👌👌👌👌👌👌
हे स्वप्नातच होऊ शकत...😅😅 ..मस्तच..👍👌✍️✍️🍫🍫
वा, भारीच की....👌👌👌👌
सुंदर स्वप्न ✍️��
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
व्वा..भारीच ..पैठणी राहून गेली😂😂😂
Post a Comment