Sunday, 21 February 2021

आई आजारी पडते तेव्हा


 

आई आजारी पडते तेव्हा
घरादाराचे चित्र बदलते
टापटीप असणारे घर
पसाऱ्यात वावरते
एकही वस्तु जाग्यावर नसते
अन बाबांची खूपच धांदल उडते
ऑफीसला मग दांडीच लागते
बाबांची वर्णी किचन मध्ये लागते
वस्तू शोधण्यातच वेळ निघून जाते
बघता बघता शाळेची बस येते
वाट बघून बस लगेच निघून जाते
त्यादिवशी मग शाळेची पण सुट्टी होते
गोंधळ हा ऐकून आजारी आई अस्वस्थ होते
अपराधीपणाची भावना मग तिच्या मनी जागते
पण असे का?
सांगेल का कुणीतरी
आईला साधं आजारी पडण्याचीही मुभा का नसते

रजनी✍️



मैत्रिणीचे लग्न आणि भंगलेल स्वप्न


 

मैत्रिणीचे लग्न लागताच
स्वागत समारंभाची झाली गडबड
आगमन होता वधू वराचे
स्टेज जवळ उडाली एकच झुंबड
सहजच माझी नजर त्या
गर्दीकडे वळली
अन बघताच त्याला जणू
माझी नजरबंदी झाली
उंचपुरा हॅण्डसम असा
परफेक्ट मॅरिज मटेरियल जसा
एका क्षणासाठी मी ट्रान्स मध्ये गेले
अन वधुवरांच्या जागी आम्हां दोघांना बघितले
..
...
.
.
.
.
.
.
.
छोट्या मुलाच्या आवाजाने
तेव्हा मी भानावर आले
..
.
.
...
.
.
..
.
.
जेव्हा ते मूलं
.
.
..
.
.
.
.
.
" पप्पा" " पप्पा"
.
.
.
. म्हणून त्याच्या कडे झेपावले😠😔😄😄😄😄
..
..
रजनी✍️



Friday, 19 February 2021

पूर्णवेळ गृहिणी


 

गृहीणीचं घर ही तिची
पहिली नोकरी असते
अविरत असेल ती ही त्यात
याची सर्वांना खात्री असते

आपल्या कुटुंबाच सुख
यातच ती सुखी असते
सिक लिव्ह, कॅज्युअल लिव्ह
जणू तिच्यासाठी नसते

नोकरीत या नसते
वेळ केलेली फिक्स
अन बहुतेक वेळा
तर नसतो हाती मदतनीस

परफॉरमन्स इंम्परुव्हमेटची
असते नेहमीच अपेक्षा
पण परफॉरमन्स अप्रेजलच्या
वेळी नेहमीच होते उपेक्षा

तरीही या नोकरीत
ती मनांपासून रमते
अन पगाराची मात्र
तिला कधीच अपेक्षा नसते

तिचा पगार आणि बोनस असतो
घरच्यांची माया आणि प्रेम
मग मिळेना का तिला या
नोकरीत बढती आणि फेम

रजनी✍️



Thursday, 18 February 2021

काजळ काळी गर्द रात


काजळ काळी गर्द रात
आपल्या विरहाची
अन मिलनाच्या प्रतीक्षेत
तुझी सखी रजनी(रात्र)

                            काजळ राती

काजळ काळी गर्द राती
होते आठवणींची गर्दी
त्या गर्दीत मी हरवत जाते
अन बघता बघता रात्र सरते

                            

                           बाहुपाश

 काजळ काळ्या गर्द राती
  रातकिडे हे किरकीरती
  उमटे सावल्या अवतीभवती
   अन उरी दाटून येता भिती
   तव प्रेमळ बाहुपाश
  असता मज भोवती
   काळी रातही सत्वर सरती

रजनी✍️

 



Sunday, 14 February 2021

कविता आणि चारोळी

 "पण तो आरश्यात का दिसत नाही" या विषयावर लिहिलेल्या दोन कविता आणि एक चारोळी इथे सादर करते.

                     "तो ती आणि आरसा"

ती आरश्यात पाहताना
तो का दिसतं नाही
अस हे कोडं खरंच
तिला उलगडत नाही
तरीही ओले केस सावरताना
तिचं लाजून आरश्यात बघणं
अन कुणालाच कळणार नाही
अस त्याचं आरश्यात न दिसता ही
ओलावा टिपणाऱ्या पंच्यासारखं
तिच्या ओल्या केसांना कुरवाळण

                        " मनाचा आरसा"

तो दिसत नाही तिला
समोरच्या आरश्यात
कारण त्याचे प्रतिबिंब उमटते
तिच्या मनाच्या आरश्यात


                        "त्याचं प्रतिबिंब"

तो आरश्यात का दिसतं नाही ह्या
कोड्याने तिला खूप वेळा सतावलं
मग एक दिवस ह्याच कारण
तिला बाथरूम मध्ये उमगलं
.
.
.
.
.
.
.
.
जेव्हा स्टाईल च्या नावाखाली टाचेखाली
लोळणाऱ्या आणि मळणाऱ्या जीन्सला तिने
साबणाच्या पाण्यात बुडवलं....
.
.
.
.
.
.
.
.
साबणाच्या फेसात जेव्हा
त्याचं प्रतिबिंब उमटलं
.
.
.
.
तेव्हा कर्तव्यदक्ष गृहिणीने त्या प्रतिबिंबाला
धोपटण्याने मनसोक्त धुतलं😀😀😀😀

रजनी✍️

Friday, 12 February 2021

सखा(लघुकथा)

                             सखा

"ए भांडी एएए "अशी जोरदार आरोळी कानी आली आणि सुमतीताई लगबगीने बाल्कनीत आल्या आणि त्या भांडीवालीला आवाज देऊ लागल्या.ती जराशी पुढे येऊन बाल्कनीखाली उभी राहिली,पण ती नेहमीची नसल्याने त्यांनी तिला विचारले,"तू नवीन आहेस का?रखमा येत नाही का आता?"
               "न्हाय जी ,तिचं वय झालं जी आता तर म्या येते ,तिची मुलगी." "ये वर ये जिन्याने ",सुमतीताई बोलल्या.
ती तिचं समान आवरत वर आली आणि दरवाज्यातच एक बाजूला बसली.गेले जवळजवळ वर्षभर त्या इथे नव्हत्या त्यामुळे त्यांना रखमाबद्दल काहीच माहीत नव्हतं.
                "तुझं नाव काय?"सुमतिताईंनी हसून विचारलं."जी म्या लक्षुमी",अरे वाह दिसतेस पण अगदी लक्ष्मीसारखी,असे बोलून त्यांनी तिचं निरीक्षण करायला सुरुवात केली.रखमापेक्षा उजळ वर्ण,रेखीव चेहरा,चांगला बांधा आणि उंचपुरी शिवाय चेहऱ्यावर एक वेगळच तेज अशी लक्ष्मी त्यांना पहिल्या भेटीतच खूप आवडली.नंतर तिच्याशी गप्पा मारत स्वतःकडचे कपडे दाखवून एक छोटंसं भांड घेऊन त्यांनी तिचा निरोप घेतला.
               लक्ष्मी गेली तरी तिचे विचार काही त्यांच्या डोक्यातून लवकर गेले नाही."हिरा हा नेहमी कोळशाच्या खाणीतच जन्म घेतो ",त्या स्वतःशीच बोलल्या आणि आपल्या कामाला लागल्या.दोन तीन दिवसांनी त्यांना परत तिचा आवाज आला,त्या तिला बघण्यासाठी बाल्कनीत गेल्या त्यावेळी ती कोपऱ्यावर असलेल्या झाडाखाली एका तरुण  मुलाच्या  मदतीने भांड्यांची पाटी खाली उतरवत होती.त्या दोघांनी तिथे जमिनीवरच बैठक मारली होती आणि सावलीला दोन घटका विसावली होती.
               थोडा वेळ गप्पा गोष्टी करून ती दोघे आपल्या मार्गांनी निघून गेले.असेच दिवसं मागून दिवस चालले होते,कधीतरी लक्ष्मीचा आवाज येई पण ती दूर गेलेली असे ,तर कधी झाडाखाली सावलीत बसलेली असे.एके दिवशी जवळजवळ पंधरावीस दिवसांनी त्यांनी तिचा आवाज ऐकला आणि बाल्कनीत येऊन तिला पाहताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला,कपाळावर मोठं कुंकू ,गळ्यात डोरल काठपदाराची नऊवारी गुढग्याच्या खाली नेसलेली.तिचं लोभसवाणे सौंदर्य आणखीनच खुलुन दिसत होतं.
            असेच दिवसामागून दिवस जात होते,लक्ष्मी आताही नेहमीसारखी भांडी घेऊन येत होती.कधीतरी ती त्या माणसाबरोबर झाडाखाली सावलीला गप्पा मारताना दिसे.तो माणूस कधीकधी विक्रीसाठी फळाची गाडी आणायचा मग त्यातलं एखादं फळ तिला देऊन,आपापल्या मार्गांनी निघून जात असे.
            लक्ष्मीचं येणं,त्या दोघांचे असं घटकाभर झाडाखाली विसावा घेणं आणि नंतर आपापल्या मार्गांनी निघून जाणं ,हे सर्व सुमतीताई आपल्या बाल्कनीतून पाहत असतं.तिच्याबद्दल त्यांना आपुलकी होतीच आता हे कुतूहल ही त्यांना शांत बसू देत नव्हते.परंत तिला याबद्दल काही विचारायला त्यांना संकोच वाटत होता.अशातच गावावरून भावाचं पत्र आलं आणि त्यांना गावी जावं लागलं.
              गावचे सर्व कामे आटोपून येण्यात त्यांना जवळजवळ एक महिना लागला.गावावरून आल्यावर एक दोन दिवसांनी त्यांना लक्ष्मीची आठवण येऊ लागली आणि त्या बाल्कनीत तिच्या येण्याच्या वेळी चक्कर टाकू लागल्या.
सलग चार दिवस वाट बघितल्यानंतर ती त्यांना दिसली आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
            थोडीशी कृश झालेली,पांढर कपाळ आणि अंगावर पांढरी सुती साडी,तिला तसं बघून त्यांना खूप वाईट वाटलं.तिला बोलावून तिची चौकशी करावी असा त्यांना खूप वाटलं पण धक्क्याने हाती कृती काही घडली नाही.
नंतर दोन दिवसांनी परत तिचा आवाज आला त्यावेळी सुमतीताई बाल्कनीत गेल्या तर ,नेहमीसारखी ती कोपऱ्यावरच्या झाडाखाली सावलीला बसलेली आणि तोच फळवाला तिच्या पाटीजवळ बसून गप्पा मारत आणि फळं खात त्यांना दिसली.त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.मनातलं कुतूहल काही गप्प बसू देईना.
          तरीही,त्यांनी याबद्दल तिला आता काही विचारू नये असं ठरवलं आणि आपल्या कामाला लागल्या.एके दिवशी अचानक त्या बाल्कनीत उभ्या असतानाच लक्ष्मी खालून जाताना दिसली आणि त्यांनी तिला आवाज देऊन वर बोलावून घेतलं.नेहमीसारखा वर येऊन लक्ष्मी दरवाज्याजवळ बसली.तिच्यासाठी पाणी आणून त्यांनी तिची चौकशी केली,"काय सांगायचं बाई जी माझा मालक लई दारू प्यायचा ,त्यातच त्याची किडनी गेली आणि तो गेला."आता भांड्यांचा धंदा बंद करून हा काच सामानाचा धंदा सुरू केलाय.कसातरी आला दिवस काढतुय म्या".
              "हे बघ लक्ष्मी तू धिर सोडू नको,सर्व काही नीट होईल असे म्हणून सुमतीताई ने तिला थोडेसे पैसे देऊ केले आणि तिचा निरोप घेतला.लक्ष्मी गेली तरी तिचा विचार काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता.तरुणपणीच हे असं वैधव्य उभं आयुष्य पडल आहे पोरीसमोर कशी करणार ती,त्या स्वतःशीच पुटपुटल्या आणि आपल्या कामाला लागल्या.
            दिवसामागून दिवस जात होते,लक्ष्मीच येणं ,आरोळी देणं ,कधीतरी झाडाखाली विसावा घेणं नेहमीसारखेच सुरू होतं.एके दिवशी अचानक सुमातीताईंनी  लक्षमी तिच्या नेहमीच्या वेळी दिसली पण आमूलाग्र बदललेली.कपाळावर कुंकवाचा टिळा,हातात हिरवा चुडा आणि गुडग्यापर्यंत नेसलेली काठपदाराची नऊवारी साडी.
ताईंचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना ,त्यांनी लगेचच तिला आवाज देऊन वर बोलावून घेतलं.
                 नेहमीप्रमाणे लक्ष्मी वर येऊन दरवाज्याजवळ बसली,ताईं म्हणाल्या ,"अरे वाह , तू दुसरं लग्न केलं तर","खूप छान झालं."
"काय करतो तुझा नवरा"?सुमातीताईंनी विचारले
"जी तो बांधकामाच्या जागी रोजंदारीवर जातो",लक्ष्मी म्हणाली
थोडंस आश्चर्य वाटून ताई बोलल्या,"म्हणजे तू त्या फळवाल्याशी नाही लग्न केलं".माफ कर हं पण मला वाटलं तू त्याच्याशी लग्न करशील.
          "त्याचं काय आहे जी तो फकतस माझा मैतर हाय,माझा सखा आहे .माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत असणारा ,कसलीही अपेक्षा न ठेवता मला मदत करणारा.
सखा हाय तोवर आम्ही आनंदी हाय,आम्हाला एकमेकांची काळजी आहे कंची बी अपेक्षा न ठिविता.एकदा का सखा नवरा झाला की,हक्क,अरेरावी,अपेक्षा आणि मालकीभावना आली अन प्रेम तर लांब पण कधी कधी आपुलकी बी उरत नाही वरती फक्त जुलमाचा रामराम."
           त्यात माझं हे असं दुसरं लग्न त्यात त्याचा काय दोष म्हणून नाही केलं जी ."
           ताईंनी या वेळी तिच्याकडून किरकोळ सामान घेतलं आणि तिला निरोप देऊन बाल्कनीत येऊन  उभ्या राहिल्या.एक अडाणी मुलगी पण वास्तवाचे चटके सोसून
किती प्रगल्भ झालेले तिचे विचार.त्या कितीतरी वेळ तिच्या विचारात हरवून गेल्या.त्यांना त्यांचे तरुणपणीचे दिवस आठवले.त्याकाळाप्रमाने ठरवून झालेले लग्न,यजमानांच्या अबोल आणि विचित्र स्वभाव.घर आणि ऑफिस कसरत करत संभाळलेली नोकरी.नोकरी करत असताना सोबतचे पुरुष सहकारी किती चांगले होते,प्रसंगी उशीर होत असेल तर वाटून घेतलेली कामे,मुलांच्या कॉलेज ऍडमिशनच्या वेळी निस्वार्थ पणे केलेली मदत.बॉस ने कौतुक केल्यावर ते साजरे करण्यासाठी ऑफिसमध्येच एकत्रपणे केलेला चहा नाश्ता(म्हणजे आजच्या भाषेत पार्टी).
         पण ऑफिस व्यतिरिक्त बाहेर कुठे कार्यक्रमात नवरासोबत असताना सहकारी भेटले तर फक्त औपचारिक ओळख यापलीकडे काही नाही.नवऱ्यासमोर बोलण्याची पण हिम्मत व्हायची नाही.तो कसा रिऍक्ट होईल आणि गैरसमज होतील ही भीती.अश्या एक ना अनेक विचारांत त्या गुरफटून गेल्या.नेमकं त्याचवेळी त्यांचे यजमान वामकुक्षी आटोपून चहासाठी ह्यांना हाका मारत होते.
              शेवटी स्वतः बाल्कनीत येऊन ताईंना समाधी अवस्थेतेतून बाहेर काढून त्यांनी त्यांची चौकशी केली.काही नाही हो समोर झाडावर बघा त्याचिमणीने किती छान घरटं बांधलं आहे आणि आत दोन पिलही दिसत आहे तेच बघत होते.तुम्ही बायका पण ना शेवटी घर आणि मुलं यातच अडकलेल्या असता नवऱ्याचा काही विचार आहे की नाही ,अग चहा देतेस ना मित्र वाट बघत असतील माझी मैदानावर.आता आणते हं,तुम्ही तयारी करा म्हणत सुमातीताईंनी स्वयंपाकघर गाठले आणि नेहमीच्या सरावाने कामाला लागल्या.

रजनी✍️




     


चारोळ्या

"तुझा भास "या विषयावर सुचलेल्या काही चारोळ्या इथे सादर करते.

                    

तुझा भास होणं हे
आता रोजचंच झालंय
अन भासानंतर तूझ न
येणं ही नेहमीच झालंय


सारखा होतो भास तुझा
पण येत नाहीस तू
भासा इतुका ही वेळ
सांग ना का देत नाहीस तू


तुझा भास तुझा श्वास
सारे काही तुझेच ना
प्रेमात तुझ्या आकंठ मी
माझी मी उरलेच ना


नुसत्या भासाने तुझ्या
गाली मोरपीस फिरते
अन  स्पर्शासाठी तुझ्या
मग ही काया आसुसते


तुझ्या प्रेमाचं गारुड
असं काही चढलंय
की तुझा भास होणं
हे आता रोजचचं झालंय


रजनी✍️



Tuesday, 9 February 2021

फसलेली प्रेमकथा

 

                        फसलेली प्रेमकथा



कॉलेजमध्ये त्याला पहाताच
जणू नजरबंदी झाली
त्या क्षणापासून नजर
फक्त त्यालाच शोधू लागली
दुसऱ्या दिवशी वर्गात बघताच
माझी खात्री झाली
योगायोग खरंच असतात
याची प्रचिती आली
यथावकाश ओळख झाली
आवडीनिवडी जुळल्या
सेमिस्टर संपता संपता
आमचा चांगलाच  ग्रुप जमला
कॉलेजमध्ये वाहू लागले
डेज सेलिब्रेशन चे वारे
त्या वाऱ्यावर घेऊ लागले
मन माझे हेलकावे
रोझ डे च्या दिवशी
तर चमत्कारच झाला
पिवळा अन लाल दोन
गुलाब घेऊन तो आला
पिवळा गुलाब देऊन
मला रोझ डे विश केला
.
.
.
.
.
अन या मैत्रीच्या गुलाबाला
जागशील ना असे कानी कुजबुजला
.
.
.
.
.
.
.प्रश्नार्थक मुद्रेने मी सवाल केला
.
.
.
.
.
.सेटिंग माझी करून देशील
..
..

तो निरागसपणे बोलला
..
..
.
.फार काही नाही
.
.
.
.
हा लाल गुलाब द्यायचा आहे
तुझ्या मैत्रिणीला🌹😡😀😥

रजनी✍️



नको उघडू ते दार

"नको उघडू ते दार"
या विषयावर मी एक चारोळी आणि दोन कविता केल्या आहेत
तर ते तीनही मी इथें एकाच ब्लॉग वर सादर करतेय.

कविता 1


 

नको उघडू ते बंद
दार माझ्या अंतर्मनाचे
उघडताच वाहतील पाट
दडपलेल्या भावभावनांचे
त्यांच्यासोबत वाहणं
तुला जमेलच असं नाही
अन पुन्हा एकदा त्यांचं दडपण
मला साहवेल असं ही नाही


                          चारोळी 

नको उघडू ते दार
माझ्या अंतर्मनाचं
तुला गवसेल कारण
आपल्या दुरावलेल्या मैत्रीचं

                          
कविता 2

नको उघडू ते बंद
दार माझ्या अंतर्मनाचे
उघडताच वाहतील पाट
दडपलेल्या भावभावनांचे

त्यांच्यासोबत जगणं
तुझ्यासाठी सोपं नाही
अन त्यांच्यासोबत वाहणं
तुला जमेलच असं नाही

माहीत आहे मला आपल्यात
तुझं माझं असं काही नाही
पण यामुळे तुझं दुःखी होणं
मला आवडणार नाही

बंद आहे तर बंदच राहू दे
दार माझ्या अंतर्मनाचे
कारण पुन्हा एकदा त्यांचं
दडपण मला साहवेल असं ही नाही

रजनी✍️




Sunday, 7 February 2021

पहाटेच स्वप्न


उष:काल होता होता
स्वप्न एक पडले
नवऱ्याने आज मला
बेड टी द्यायचे ठरवले🙂🙂
बेड टी ची वाट बघत मी
ब्लॅंकेट जवळ ओढले☺️☺️
अन चहाच्या सुगंधाची
वाट बघू लागले🤔
आंबटसर वासाने
स्वप्न माझे भंगले😏
.
.
.
.
.
स्वयंपाक घरात जाऊन कळले
की,
.
.
.
.
.
.
.
.
..
.
दूध समजून नवऱ्याने
ताकाचे भांडे होते गॅसवर ठेवले🙄😡

रजनी✍️



 

Tuesday, 2 February 2021

शेवटचे शब्द


 

अजूनही आठवतोय
तो सुंदर प्रवास
तुझं जणू माझी वाट
पाहत असल्यासारखे थांबणं
माझं गाडीत आरामशीर  बसणं
हवेत किंचित गारवा असणं
रेडिओवर माझ्या आवडीचं गाणं लागणं
आणि सोबत रस्त्यावर ट्रॅफिक नसणं
त्यामुळे छान वेगात तुझं गाडी चालवणं
त्यामुळे माझंऑफिसला वेळेवर पोहोचणं
पोहचताच तुला भाडं विचारणं
पाचशेची नोट काढून तुला देणं
त्यांवर विचित्रपणे  तुझं माझ्याकडे बघणं
आणि बोलणं,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. छुट्टा पैसा दीजिए आंटी
त्यावर माझं सात्विक संतापानं ........आणि बोलणं
ते माझे शेवटचे शब्द
.
.
.
.
.
.
.
आंटी किसको बोला तुमने,आंटी होगी तुम्हारी मम्मी😡😡😡माहीत नाही कुठुन येतात सकाळी सकाळी😠😠😡😡

रजनी✍️


अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...