"तुझा भास "या विषयावर सुचलेल्या काही चारोळ्या इथे सादर करते.
तुझा भास होणं हे
आता रोजचंच झालंय
अन भासानंतर तूझ न
येणं ही नेहमीच झालंय
सारखा होतो भास तुझा
पण येत नाहीस तू
भासा इतुका ही वेळ
सांग ना का देत नाहीस तू
तुझा भास तुझा श्वास
सारे काही तुझेच ना
प्रेमात तुझ्या आकंठ मी
माझी मी उरलेच ना
नुसत्या भासाने तुझ्या
गाली मोरपीस फिरते
अन स्पर्शासाठी तुझ्या
मग ही काया आसुसते
तुझ्या प्रेमाचं गारुड
असं काही चढलंय
की तुझा भास होणं
हे आता रोजचचं झालंय
रजनी✍️
No comments:
Post a Comment