Sunday, 21 February 2021

आई आजारी पडते तेव्हा


 

आई आजारी पडते तेव्हा
घरादाराचे चित्र बदलते
टापटीप असणारे घर
पसाऱ्यात वावरते
एकही वस्तु जाग्यावर नसते
अन बाबांची खूपच धांदल उडते
ऑफीसला मग दांडीच लागते
बाबांची वर्णी किचन मध्ये लागते
वस्तू शोधण्यातच वेळ निघून जाते
बघता बघता शाळेची बस येते
वाट बघून बस लगेच निघून जाते
त्यादिवशी मग शाळेची पण सुट्टी होते
गोंधळ हा ऐकून आजारी आई अस्वस्थ होते
अपराधीपणाची भावना मग तिच्या मनी जागते
पण असे का?
सांगेल का कुणीतरी
आईला साधं आजारी पडण्याचीही मुभा का नसते

रजनी✍️



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...