नको उघडू ते बंद
दार माझ्या अंतर्मनाचे
उघडताच वाहतील पाट
दडपलेल्या भावभावनांचे
त्यांच्यासोबत वाहणं
तुला जमेलच असं नाही
अन पुन्हा एकदा त्यांचं दडपण
मला साहवेल असं ही नाही
चारोळी
नको उघडू ते दार
माझ्या अंतर्मनाचं
तुला गवसेल कारण
आपल्या दुरावलेल्या मैत्रीचं
नको उघडू ते बंद
दार माझ्या अंतर्मनाचे
उघडताच वाहतील पाट
दडपलेल्या भावभावनांचे
त्यांच्यासोबत जगणं
तुझ्यासाठी सोपं नाही
अन त्यांच्यासोबत वाहणं
तुला जमेलच असं नाही
माहीत आहे मला आपल्यात
तुझं माझं असं काही नाही
पण यामुळे तुझं दुःखी होणं
मला आवडणार नाही
बंद आहे तर बंदच राहू दे
दार माझ्या अंतर्मनाचे
कारण पुन्हा एकदा त्यांचं
दडपण मला साहवेल असं ही नाही
रजनी✍️

No comments:
Post a Comment