Monday, 6 September 2021

अहम् अर्थात इगो


 

नात्याची वजाबाकी करायची
म्हणजे नेमकं काय करायचं
जवळच्या व्यक्तीच्या लिस्ट
मधलं एक नाव काढायच
प्रत्यक्षात न भेटता फक्त
आठवणीत रमायचं
आडून आडून त्याची
माहिती काढत रहायचं
लांबूनच त्याच्या यशात
आपण खुश व्हायचं अन
त्याला दुःख झालेल
पाहून आपण दुःखी व्हायच
कळतं असते सर्व पण
वळवून नाही घ्यायचं
किती ही मनांत आलं तरी
आपला हेका नाही सोडायचं
अचानक समोर आलेच
तर मान वळवून घ्यायचं
एवढुश्या त्या इगोला
उगीच गोंजारत बसायचं
अशा वेळी मित्रांनो मतभेद
तिथे सोडून देण्यात खरं सुख असतं
कितीही वजा करायच ठरवलं तरी
काहीतरी बाकी रहात असतं

रजनी✍️©®
6/09/21

7 comments:

slaher said...

अप्रतिम अप्रतिम ... खूपच छान विचार शब्द आणि सगळंच लई भारी ...🤗
रजनी जी खूपच छान सादर केलीय ही रचना ...!!
🍜🍧🍜🍧🍜🍧🍜🍧🍜🍧🍜

🤗
🙏 "आबा".....!!💐

Unknown said...

छान विचार मांडले आहे रजनी
खुप सुंदर

Unknown said...

अप्रतिम, खूप सुंदर👌👌👌

धिरज said...

वाह, खुपच छान..👌

आपले हितगुज said...

धन्यवाद आबा☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...