तिथे काय खळबळ आहे?
याचीच असते चिंता
सोडवायचं ठरवलं होतं
पण वाढतच गेला गुंता
तु असा का गेलास
काहीही न सांगता
चुकलंच रे माझं मीच भांडले
तुझ्याशी शहानिशा न करता
कुठे असशील ,कसा असशील
हेच विचार सतावतात
तू तर येत नाहीस
पण तुझ्या आठवणी येतात
डोळ्यांत प्राण आणून मी
तुझीच वाट पहात आहे
एक तुझी काळजी सोडली तर
सार इथं आलबेल आहे
रजनी✍️©®
17/09/21

8 comments:
अप्रतिम सुंदर रचना मॅम
मनःपूर्वक धन्यवाद☺️☺️☺️🙏🙏
खूप खूप मस्त mam
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
व्वा ऽ ...👌
खूपच छान सुंदर...!👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌👌
अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌
Post a Comment