पाऊस नसते पुस्तकातील केवळ
एक कविता
पाऊस असते हळव्या मनाची सुंदर
एक प्रतिमा
पाऊस नसते उगाच कटकट अन्
फजिती
पाऊस असते गरमागरम चहा अन्
खमंग भजी
पाऊस नसतो फक्त गार वारा अन्
ऋतु हिरवा
पाऊस असते धुंद सरगम ,ती अन्
तो बावरा
पाऊस नसतो फक्त ढगांचा गडगडाट अन्
विजांचा कडकडाट
पाऊस असतो डू लणाऱ्या शेतातील चिंब भिजलेली
नागमोडी पायवाट
पाऊस म्हणजे आकाश आणि धरतीचा
मिलनाचा क्षण
धरतीमध्ये मिसळून परि तृप्त करतो
कण न कण
मिलनामुळे त्यांच्या सागरास ही
येते भरती
फेसाळणाऱ्या लाटा करतात
गर्दी किनाऱ्यावती
रजनी✍️

No comments:
Post a Comment