माझा मी न उरलो
आले आनंदाश्रु दाटून
तुझे पहिले टॅहॅ
गेले कानी निनादून
माझा मी न उरलो
तुला कुशीत घेऊन
क्षणार्धात बाबा झालो
तुझं आगमन होऊन
माझा मी न उरलो
गेलो खूप सुखावुन
पहिली हाक ती बोबडी
ठेवली हृदयात साठवून
माझा मी न उरलो
तुझ्यासाठी जागून
कासावीस झाला जीव
तुला रडताना पाहून
माझा मी न उरलो
बोबडे बोल ऐकुन
बडबड गीत तुझे
घेतो कानांत साठवून
माझा मी न उरलो
तुझ्याशी खेळून
गुडघ्यावर घोडा होऊन
भातुकलीचा खाऊ खाऊन
माझा मी ना उरलो
तुझी प्रगति पाहून
भारावून जातो नेहमी
तुला मोठं होताना पाहून
माझा मी ना उरलो
तुझा मित्र होऊन
भूतकाळात मारली फेरी
तुझा हात हाती घेऊन
माझा मी ना उरलो
गेलो आठवणीत हरवून
पिलु मोठे होऊन आज
गेल घरटं सोडून
माझा मी ना उरलो
पण खात्री आहे मला
पिलु परतुनी येईल
अन थोडा वेळ देईल मला
माझा मी ना उरलो
अन जेव्हा गात्र ही थकतील
शेवटचे श्वास माझे तेव्हा
त्याच्या कुशीत विसावतील
रजनी✍️

No comments:
Post a Comment