लिहायच होतं बरंच काही
पण शब्द माझ्यावर रुसले होते
अद्दल घडविण्यासाठी मला जणू
मनाच्या कोपऱ्यात दडले होते
शब्द संपत्ती ही माझी मी
वारेमाप खर्चत होते
कदर नाही अश्यांवरही
शब्दसुमने उधळित होते
जाणून मोल त्या शब्दांचे
त्यांना मी आळवित आहे
लिहायचे आहे बरेच काही
म्हणून छानसे मला सुचु दे काही
रजनी✍️

No comments:
Post a Comment