" दोन लेकींच्या वडिलांनी
मनःपूर्वक आनंदोत्सव साजरा केला
जेव्हा त्यांच्या लेकीने त्या रात्री
एका मुलाला जन्म दिला "
आजकाल मुलगा आणि मुलगी भेद करणे बऱ्याच प्रमाणात कमी झालय. पण ८० - ९० च्या काळातही हा भेद केला जायचा. माझी आजी म्हणजे वडिलाची आई या विचारांची होती. माझ्या वडिलांवर आजीचा विशेष जीव होता पण आजीच्या दुर्देवाने माझ्या वडिलांना दोन्ही अपत्ये मूलीच झाल्या. त्यामुळे आजी ला खूप वाईट वाटले. वडिलांनी कधी आजीला दुखावले नाही पण आमचाही खूप लाड केला. चांगले संगोपन केले उत्तम शिक्षण दिले.
माझ्या लग्नानंतर 21 मार्च 2008 ला जेव्हा मला पहिला मूलगा झाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते स्वभावाने हळवे असल्याने घरी थांबले होते , रात्री एक वाजता आईने दवाखान्यातून फोन करून ही बातमी त्यांना सांगितली तेव्हा, त्यांना इतका आनंद झाला की, एवढ्या रात्री जवळजवळ सगळ्या नातेवाईकांना फोन करुन त्यांनी हि बातमी कळविली. अर्थात हा तपशील मला नंतर समजला.
नंतर ही बाळाच्या संगोपनात त्यांनी आनंदाने सहभाग घेतला. त्यावेळी कडक उन्हाळा होता तर त्याचा बाळाला त्रास होउ नये म्हणून स्वतः गंध गोळी उगाळून त्याला लावायचे. दुपारी मला झोप मिळावी म्हणून तास- दोन तास त्याला खेळवायचे. मी जेवत असताना त्याला घेऊन फिरवायचे . यथा अवकाश थाटात त्याचं बारस ही त्यांनी केलं आणि आई ने त्याचे नावही खूप छान सुचविले "सार्थक".
सार्थक च्या आगमनाने त्यांना आनंदोत्सव साजरा करता आला म्हणतात ना दुधापेक्षा दुधावरची साय खूप च महत्वाची आणि प्रिय असते.
रजनी✍️

No comments:
Post a Comment