Thursday, 4 March 2021

घरापासून दूर जाताना


                                चारोळी

दूसरे घर जोडण्यासाठी
पहिले घर सोडते
घरापासून दूर जाताना
अश्रू नयनी दाटते


                                कविता

दूसरे घर जोडण्यासाठी
पहिले घर सोडते
घरापासून दूर जाताना
अश्रू नयनी दाटते

दोन घरांची मालकीण ती
जगासमोर वावरते
पण आईबाबां नंतर
फक्त कागदावर उरते

ऐका ग सख्यांनो
स्त्री म्हणून सांगते
लेकीला माहेर मिळावे
म्हणून आई सासरी नांदते


रजनी✍️

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...