Tuesday, 7 July 2020

आरती गणपतीची(वर्ष-२०२०)



जय देव जय देव जय मंगलमूर्ती
करोना हा आता जाईल कधी
जय देव जय देव।।धृ।।

मामाचे घर यंदा दूरवर राहिले
आजीलाही फक्त नेटवर पहिले
आजीची माया ही आठवावी किती
जय देव जय देव जय...... ।।1।।

शाळा झाली बंद,खेळ ही बंद
सांग रे बाप्पा जोपासू किती मी छंद
जय देव जय देव जय....।।2।।

पार्क झाले बंद, झोकेही थांबले
खरंच रे बाप्पा आता मुलं कंटाळले
जय देव जय देव जय ........।।3।।

नको ती खेळणी नि महागड्या गाड्या
मित्र आणि आप्त  सांग येती केव्हा भेटाया
जय देव जय देव जय ........।।4।।

झाले मॉल बंद सेल ना लागले
महिलांचे मग धाबे दणाणले
जय देव जय देव जय ........।।5।।

नको ऐषोआराम नि थाटमाट खास
करोना भोवती आवळ रे पाश
जय देव जय देव जय ........।।6।।

तुझ्या आगमनाची लागलीये आस
करोना जाण्याचा घेतलाय  ध्यास
जय देव जय देव जय ........।।7।।

लाडू  नि मोदक ठेवितो प्रसादा
धाव पाव रे गणराया धाव धाव आता
जय देव जय देव जय ........।।8।।

रजनी




No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...