Thursday, 16 July 2020

तुझं निष्पाप असणं



तुझं निष्पाप असणं
मला खूप भावतं
आणि हे निरागस हसणं
मनाला भुरळ घालतं

तुझ्या हसण्याने उजळून
गेलाय माझ्या घराचा प्रत्येक कोपरा
अन आनंदाने भरून गेलाय
माझ्या मनाचा गाभारा

तुझ्याशिवाय माझे असणे
भासे मला व्यर्थ
तुझ्या अस्तित्वाने आलाय
माझ्या जीवनाला नवीन अर्थ

छोटसं माझं पिलू आणि
छोटीशी माझी परी
तुमच्यासोबतच आहे खरं
जगण्यातील गंमत न्यारी

रजनी



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...