Monday, 20 July 2020

ती


ती आली ती आली
कुजबुज झाली कानी
गळून पडली कात अन
मोहक झाली कांती

ती आली वस्तीला
तुझ्या ग देहांत
घरदार रंगले सारे
तिच्या आगमन सोहळ्यात

आगमनाने तिच्या
आयुष्य तुझे बदलले
जबाबदारी ने वागणे
हे तिनेच तुला शिकविले

चार दिवस येते भेटीला
रुटीन डिस्टर्ब करते
आरामाचे महत्त्व हे
मात्र तिच्यामुळे कळते

आगमनाने तिच्या
झालीस तू परिपूर्ण
अन स्त्रीत्व तुझ्यात
झिरपले संपूर्ण

रजनी



No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...