Tuesday, 7 July 2020

पहिली भेट



पहिली भेट आपलीच आपल्याशी
घडावीशी वाटते अगदी सहज

त्यासाठी परि करावे लागते
आपल्याच मनाशी गोड हितगुज

मनाचा हा व्यापार विश्वाहुनी मोठा
विचारांच्या वळणांना इथे नसे तोटा

इथे उडतो गोंधळ स्वतः ला शोधताना
इतरांच्या कसोटीवर स्वतःला जोखताना

अश्याच एका वळणावर भेटले मी मला
मुक्त,स्वछंद,भेट स्वतःची स्वतः शी अनुभवताना


रजनी

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...