Friday, 10 July 2020

कॉलेजमधली लायब्ररी



कॉलेजमधली लायब्ररी
म्हणजे पुस्तकांची जत्रा
अज्ञानावर सापडते इथे
अचूक अशी मात्रा

कॉलेजमधील कॅन्टीन सारखी 
फार नसते गर्दी 
इथे येतात फक्त गर्दीतले दर्दी

परीक्षांच्या काळात मात्र
इथली गर्दी वाढते
पुस्तकांसोबत मग
मुलांची जत्रा भरते

अलिबाबाच्या गुहेसारखी
ही मला भासायची
हवे ते पुस्तक शोधण्यात 
खूप मजा यायची

पुस्तकांवर रेखाटलेली चित्रकारी अन
हळू आवाजात मारलेल्या गप्पा
उलगडतात मनाचा हळुवार कप्पा

अशावेळी मन म्हणते
भूतकाळात रमावे,
पुन्हा एकदा पुस्तकांच्या जत्रेत 
फेरफटका मारून यावे.

रजनी

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...