Tuesday, 28 July 2020

कॉफी आणि बरंच काही(अलक कथा)



ती एक मनस्वी मुलगी होती. बाबांची खूप लाडकी पण समजूतदार अशी यंदा कर्तव्य असलेली,अशातच त्याच स्थळ आलं,तो देखणा,रुबाबदार आणि वेल सेटल.त्यामुळे नकार देण्याचे काहीच कारण नव्हते.मुलगी दाखवण्याचे सोपस्कार होऊन आठवड्यात लग्न पार पडलं.
         लग्नानंतर पहिल्यांदाच ती दोघे फिरायला गेलेे होते.  संकोच करत एकमेकांचा अंदाज घेत ती दोघे एकमेकांसोबत वेळ घालवत होती.पाऊस नव्हता पण हवेत किंचित गारवा जाणवत होता.वातावरण ही छान होते,तेवढ्यात रोड च्या पलीकडे एक  कॅफे तिला दिसले आणि तिला कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली.ती क्षणभर थांबली ,पण तो सोबत आहे हे लक्षात येताच पुन्हा चालू लागली.
           इतक्या कमी दिवसांच्या सहवासात एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती की ,वेळीअवेळी खाणेपिणे तो कटाक्षाने
टाळतो डाएट च्या बाबतीत तर तो खूप जागरूक आहे.त्यामुळे कॉफी चा विचार झटकून ती बाईक वर बसली.हिचे रेंगाळणे त्याच्या नजरेतून सुटले नव्हते.त्याने बाईक सुरू केली आणि यु टर्न घेतला.
            काही क्षणात बाईक त्या कॅफे समोर उभी केली.बाईक पार्क करून तो तिच्याजवळ आला आणि अगदी रोमँटिक होत ,तिचा हात हातात घेऊन तिला कॅफे मध्ये घेऊन गेला.ती मनोमन खूप सुुखावली आणि त्या पहिल्या कॉफी डेट नंतर  त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

रजनी
     



1 comment:

धिरज said...

वाह, खूपच छान

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...