ऑफिस मध्ये आमच्या
काम कमी आणि लफडीच फार
आणि काय सांगू राव
फाईलींच्या ढिगाखाली मी मात्र बेजार😣
ह्यांचे कसे जुळते लगेच प्रेम
ह्याचं मला पडतं कोडं🤔
तरीही बॉस मलाच
बोलतो काम कर पुढे बघून थोडं😏
मी म्हणालो हे असे
किती दिवस चालणार
आपल्याला का कुणी
कधीच नाही पटणार🙄
इयर एन्ड जवळ आला
सुरू झाली नवीन भरती
आशेवर मग मन ही डोले
त्या नाजूक प्रेमलहरींवरती🤗
अशातच ती परी
नवीन रुजू झाली
माझ्यासकट सर्व भ्रमरे
तिच्या भोवती गुंजारावली😚
सर्वाना सोडून ती
माझ्याशी हसली😍😍
आणि जवळ येऊन माझ्या
कानांशी कुजबुजली.....🤗🤗
पिंट्या मेल्या ऊठ ऑफिसला
जायला उशीर होतोय😂😂
रजनी

No comments:
Post a Comment