Sunday, 27 September 2020

मनातलं वादळ


विचारांचे उमटले वादळ
अन् काहूर मनी दाटले
तो आणि कुटुंबामध्ये
तिने कुटुंबाला निवडले
नीती अनितीच्या चक्रात
अडकून फाटली आहे
तिच्या मनाची चादर
आता तरी करेल का कुणी
तिच्या हळव्या मनाचा आदर
त्याग म्हणता येणार नाही
पण स्वार्थी ही कुणी नका म्हणू
दोन क्षणासाठी तरी तिच्याकडे
माणूस म्हणून आता पाहू

रजनी


 

8 comments:

Unknown said...

Chhan

आपले हितगुज said...

Thank you

Unknown said...

छान 👌

आपले हितगुज said...

Thank you

Rahul Dhuldhule said...

छान

Manoj Panje said...

Sundar 👌👌👌

आपले हितगुज said...

Thank you

Naveen said...

भोवताली घोंगवणाऱ्या वादळात होडी धक्क्याला लावण्याची हीच ती वेळ असल्याचं तिचं अस्वस्थ मन सांगत होतं. मनातलं वादळ शांत बसून देत नव्हतं.

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...