पाय तुझे सुकुमार
दुडूदुडू धावणार
मऊ मखमली स्पर्श
मनी माझ्या उरणार
बोट धरून आईचे
पाऊल तुझे टाकणे
रम्य तुझ्या आठवणी
माझे तुझ्यात गुंतणे
उड्या मारून धावणे
तुझे सदा सर्वकाळ
खेळासाठी तु तयार
तुझ्यासवे धावे काळ
शाळेतील कवायत
मित्रांसवे मौज मस्ती
नकळत होई मोठा
कसे दिवस धावती
बळ येणार तुझ्यात
आधार माझा होशील
शिक्षण घेऊन छान
वार्धक्यात जपशील
स्वप्न आहे बाळ माझे
यश किर्ती तुला लाभो
पांग फेडून या आईचे
समाधान तुला लाभो
सौ. रजनी भागवत.
13/6/22

No comments:
Post a Comment