Saturday, 4 July 2020

कविता- लॉकडाऊन मधील भांड्यांचे मनोगत





जेवणानंतर अक्षयपत्रात(बेसिन)जमलेल्या भांडयानी केला एकच गलका.....
थोडीशी थकून मी म्हणाले घेऊ द्या मला जरासा डुलका.

माझे म्हणणे ऐकून त्यांना आले खदखदून हसू
भांडी म्हणाली जा ग बाई जा तुझ्या कामाचा पाढा आमच्यापुढं नको वाचूस.

म्हातारीच्या गोष्टीप्रमाणे मी मात्र पुटपुटले ,डुलका घेते, फ्रेश होतें, नंतर चहाची भांडी वाढवून तुम्हा सगळ्यांचा समाचार घेते.

ताट -वाटी, कप-बशी आणि इतर पात्रांनी केली कुजबुज,जावू द्या रे तिला आपण करू आपले हितगुज.

एरव्ही एवढ्या संख्येने आपण तरी केव्हा भेटणार
कप-बशी,ताट-वाटी,चमचेच काय ते नळाखाली विहार करणार.

आताशा आपल्याला जरा अच्छे दिन आलेत,
ठेवणीतल्या भांडयानाही वारंवार पाण्याचे दर्शन झाले.

खमंग आणि रुचकर पदार्थांनी सर्व पात्रे सुखावले,
माणसांचे माहीत नाही पण लॉकडाऊन चे असे हे फायदे आम्हा भांड्यांच्या नशिबी आले.

रजनी


8 comments:

Rahul Dhuldhule said...

सुंदर रचना सादर केली.

Unknown said...

छानच कविता..भांडी बोलत आहेत असे वाटल

आपले हितगुज said...

धन्यवाद सखी

Ashwini Rathod said...

अतिशय सुरेख रचना 👌👌🤣

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

Urmila Parulkar " रंजू " said...

मस्तच 👌🏻👌🏻👌🏻

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

ऐंजल वैशू (वैशाली पडवळ) said...

खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...