Sunday, 26 July 2020

एका निवांत क्षणी



एका निवांत क्षणी
होते आठवणींची गर्दी
स्वतः विसरून मी मग
लाविते  तिथे वर्णी

एका क्षणात मोहळ उठतो
मनी जपलेल्या आठवांचा
जगलेल्या त्या क्षणांचा
अन सरलेल्या त्या वर्षांचा

अश्याच एका  निवांत क्षणी
मन आईपाशी जाते
सुरकूतलेली काया आठवून
अश्रू नयनी  दाटे

वरून कडक नारळ
आत गोड गोड पाणी
अश्या माझ्या बाबांच्या
स्मृती दा टून येती मनी

अश्याच निवांत क्षणी
मन माहेराशी जाते
छोट्या छोट्या गोष्टी
आठवून मन माझे मोहरते

अश्याच निवांत क्षणी आठवे
अंगणातली भातुकली
मायेची ती भावंडे
अन जमलेले सवंगडी

अश्याच एका निवांत क्षणावर
भूतकाळाच्या त्या उमटे खुणा
क्षणात हासू, क्षणात आसू
मग दा टुनी येती डोळा.

रजनी



2 comments:

Unknown said...

Saglyana jawalchi watavi ashi....khup chhan

आपले हितगुज said...

Thank you

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...