Friday, 24 July 2020

यश आणि अपयश



यश आणि अपयश एकत्र नांदतात
जणू एकाच आईची लेकरं वाटतात

हिंदी चित्रपटासारखं एक असतं सुखी
अन  दुसरं असत नेहमीचं दुःखी

यश चढतो शिखरांवर तर
अपयश पहिल्या पायरीवर

यश आणि अपयश यांची चाले जुगलबंदी
प्रयत्न नावाचा त्यांना मिळाला सवंगडी

यश आणि अपयश खेळतात लपंडाव
परि दोघांशिवाय अपूर्ण आहे हा जीवनाचा डाव

रजनी




अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...