लिहायच होतं बरंच काही
पण म्हणाव तस सुचलं नाही
पुन्हा एकदा शब्दांना माझ्या
कागदावर उमटणं रुचल नाही
डोळ्यांतुन मनात उतरण्याची
शब्दांना नव्हती खात्री
मग मीही केली नाही
त्यांच्यावर उमटण्याची जबरदस्ती
सहज सुचणार असतील अर्थपूर्ण शब्द
तरच लिहीण्यास काही अर्थ आहे
नाहीतर नुसतं यमक जुळवून केलेली
कविता ही व्यर्थ आहे.
रजनी✍️

7 comments:
अप्रतिम सुंदर लिखाण रजनीजी
सुंदर रचना केली मॅडम!👌👌👌
खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌☕
मनस्वी आभार
मनस्वी आभार
मनस्वी आभार
अप्रतिम रचना केलीत
Post a Comment