अलीकडेच चारोळीचा हा नवीन प्रकार माझ्या वाचनात आला प्रतिलिपिवरील माझे जेष्ठ बंधू श्री. चंद्रकांत येवला यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन मी या चारोळ्या रचल्या आहेत.
या प्रकारच्या चारोळीमध्ये प्रत्येक ओळीतील अक्षरसंख्या सारखी असते .तसेच दुसऱ्या व चवथ्या ओळीत यमक जुळवलेल असते.पहिल्या ओळीच्या शेवटच्या शब्दाने, दुसऱ्या ओळी ची सुरुवात होते तसेच तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाने चवथ्या ओळीची सुरुवात होते.
1) गुंतून गेलो (23/09/21)
हरवलेले ते शब्द
शब्द शोधत राहिलो
गवसले ते तुझ्यात
तुझ्यात गुंतुन गेलो
2)वेडं मन (23/09/21)
आयुष्य वाहतय पुढे
पुढे वाहत जाईल मी
मन वळतयं हे मागे
मागे ना वळणार मी
3)सखे (25/09/21)
हरवलेले ते शब्द शोधताना
शोधताना गवसलीस तू सखे
किणकिण करती तुझी काकण
काकण गूज तुझे सांगती सखे
4) मोल (27/09/21)
आले गेले किती हे विचार
विचार ते आपल्या प्रेमाचे
अलिप्त राहून ते कळले
कळले मोल तव प्रमाचे
5)अपराध भाव (28/09/21)
अवेळी मला सतावतील
सतावतील त्या आठवणी
प्रेम केले हा तो अपराध
अपराध भाव या जीवनी
6)गणित भावनेचे(28/09/21)
काय कमवलं अन काय गमवलं
गमवलं तुला आता उरलंय काय
मांडून बसलेय भावनेच गणित
गणित मांडून असे साधलंय काय
7) इच्छा (28/09/21)
कठीण असं काही नसतं
नसतं करायचं मनांत
सगळं होतं असता इच्छा
इच्छा फक्त पाहिजे मनांत
8)खडे बोल (28/09/21)
कोणी असं म्हणत नाही
नाही बोलायचं तू काही
बोलल्यावर खडे बोल
बोल कुणी ऐकत नाही
9) विरह (29/09/21)
विरह संपता संपेना
संपेना तुझा बहाणा
गडद झाली आहे रात्र
रात्र जीवघेणी सरेना
रजनी✍️
8 comments:
अप्रतिम...रचना👌👌👌👌👌👌
वाह... खुपच सुंदर अप्रतिम 👌👌
मला आवडेल ही नवीन शेलचारोळी शिकायला... मला मार्गदर्शन मिळेल का?
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
वाह
अप्रतिम,शेलचारोळीचा खजिनाच जणू ✌️👌
अप्रतिम सुंदर रचना
खुप सुंदर शेलचारोळी रचना...👌👍💐🍫
Khup khup chan 👌 apratim
अतिशय सुंदर रचना..
Post a Comment