Tuesday, 28 September 2021

हॉल आणि बेडरूम चे मनोगत


 आपल्या सर्वांना माहित आहे की, करोना महामारी येऊन आता खूप काळ लोटला आहे आणि आपण सर्व या न्यु नॉर्मल जगाला हळुहळु आत्मसात करित  आहोत.

        पहिल्या लाकडाऊनच्या वेळी मला " लॉकडाऊन मध्ये भांड्यांचे मनोगत" ही कविता सुचली होती त्याची लिंक मी खाली देत आहे नवीन वाचकांसाठी आणि आज , ह्या कवितेचा विषय सूचला व मी ही रचना केली. कवितेत सांगितल्या प्रमाणे खरचं माझ्या बेडरूमला ऑनलाईन  शाळेचे रुप आले आहे , सकाळ पासून दुपारपर्यंत मुलाचे classes असतात तर दुपारी  मुलीचे क्लासेस असतात. त्यामुळे आज हा विषय सूचला व ही रचना केली आहे . आशा करते ही रचना तुम्हांसर्वांना नक्की आवडेल☺️☺️🙏🙏
  
हॉल आणि बेडरुम
एकाच घरातले दोन भाग
हॉल चैतन्याचे प्रतीक तर
बेडरुममध्ये सापडे शांततेचा माग
हॉल असतो गजबजलेला
तर बेडरूम शांत पहुडलेला
पाहुण्यांचे स्वागत हॉलमध्ये होई
तरी बेडरुममध्ये निद्रादेवी चे आगमन होई
गप्पाटप्पा अन जेवणावळी टीव्हीच्या
साक्षीने हॉलमध्ये घडे
तर थकलेलं शरीर अन मन
जाऊन बेडरुममध्ये पहुडे
या अश्या दिनक्रमाला
दोघे होते सरावलेले
नव्हती कसली चिंता
मजेत दिवस चाललेले
.
.
.
.
.
.
अचानक करोनाचे आगमन झाले
दोघांचेही दिवस पालटले
पाहुण्यांचे आगमन कमी झाले
तर ऑनलाईन शाळा बेडरूममध्ये चाले
हॉल ने आपले चैतन्य गमावले
तर बेडरुमचे मात्र निवांतपण हरपले.
.
.
.
.
.
मनुष्यासोबत आता ही दोघे करती प्रार्थना
.
.
.
.
.
.
तुझ्या आगमनाने बाप्पा पुन्हा सुर होऊ दे पाहुण्यांचे येणेजाणे रंगू दे गप्पांची मैफिली, हास्य विनोद  आणि सुग्रास खाणेपिणे.
बेडरुमला ही थोडासा निवांतपणा मिळू दे
झोपण्याव्यतिरिक्त नसावे कुणाचे फारसे येणे जाणे..
.
.
.
.
...
.
.
बोला " गणपती बाप्पा मोरया"🙏🙏🙏

रजनी✍️©®
3/09/21


https://rajanibhagwat.blogspot.com/2020/07/blog-post_4.html

6 comments:

प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " said...

खूप खूप मस्त संवादात्मक लिहिलंय मॅडम!✍️������

Ashwini said...

वाह... खुपच सुंदर 👌👌👌

Kavyapushpa-kavi-sachinkamble said...

व्वा..अतिशय सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...