Wednesday, 15 September 2021

ती ( कॉफी ) आणि तो ( चहा)


 

त्याला चहा आवडायचा
पण तिला मात्र कॉफी
कुठल्या हॉटेलमध्ये जावं
याची नेहमीच पंचाईत व्हायची
त्यानं अमृततुल्य निवडलं
तर तिला कॅफे कॉफी डे हवं असायच
थोडा वेळ एकत्र घालवावा म्हंटल तर
हे चहा कॉफीचं भांडण जुंपायच
कसली ती कडू कॉफी
का उगीच प्यायची त्यापेक्षा
चहा च बरा त्याची बडबड चालायची
त्याच्या अश्या बोलण्यावर
ती खूप चिडायची , न बोलता त्याच्याशी
तिथून निघून जायची
एका कपातून चहा प्यायचा
त्याची होती फॅन्टसी
तर चिंब भिजल्यावर एक कॉफी
आणि त्याची मिठी हीच तिची फॅन्टसी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फॅन्टसी मनातच राहीली
अन त्यांचं ब्रेकअप झालं
चहा कॉफीच भांडण असं
कॉफी मग आणि चहाच्या कपात विरलं
कॉफी आवडत नसली तरी
ती त्याला आवडायची
त्याच्या आठवणीत ती ही
चहाच्या कपासोबत रात्र जागवायची
.
.
.
.
.
.
.
.
त्याच्या मनांत मात्र तिची जागा अजूनही आहे
तिच्या आठवणी काढत कॉफीमुळे तो जागा आहे.

रजनी✍️©®
16/09/21


17 comments:

मोहन सोमलकर said...

खुप छान लिखाण, सादरीकरण छान 🙏🙏🙏😊👌👌👌🤝

Rajashri Jadhav kavyapushpa.kavi.rajashri@gmail.com said...

खूप छान लिखाण , खूपच सुंदर

Rajashri Jadhav kavyapushpa.kavi.rajashri@gmail.com said...

खूप छान लिखाण,खूपच सुंदर 👌👌👌

वृषाली जोशी said...

खूपच सुंदर

Unknown said...

खूपच छान लिहिलं आहे 💐💐👌👌

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️☺️🙏🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️☺️🙏🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️☺️🙏🙏

urmila parulkar said...

खूप खूप छान 👌🏻👌🏻

Kavyapushpa.kavi.manasi said...

सुंदर काव्य.....मस्तच

slaher said...

ओहो ...!!
क्या बात है ...रजनी जीऽ !!
खूपच सुंदर छानच रचना केलीय आपण अप्रतिम च👌......!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

Kavyapushpa.Kavitri-"Shaheen" said...

अतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...