Friday, 27 November 2020

पहिली नजरानजर



बसच्या रांगेत तू नेहमी पुढे उभा असायचा

कडक इस्त्रीचे कपडे डोळ्यांवर गॉगल

अगदी चित्रपटातल्या हिरोसारखा दिसायचा

कपाळावर रुळणाऱ्या केसांच्या बटा

हलकेच मान हलवून मागे सारायचा

माझा कलेजा मात्र तिथेच खलास व्हायचा

बसच्या दिशेने पाहण्यासाठी तू हलकेच पुढे झुकायचा

मला वाटायचं गॉगलच्या आतून तू फक्त मलाच पहायचा

ओळखीचे स्मित मग माझा चेहरा दाखवायचा

ऐक दिवशी अचानक माझ्या नशिबाचा दरवाजा उघडला

रांगेमध्ये अगदी तुझ्या मागेच नंबर मिळाला

अंतरावरच्या तुझ्या सोबतीनेही अंग माझे मोहरले

अन अत्तराच्या सुगंधाने तुझ्या मन माझे सुखावले

नेहमीप्रमाणं बसच्या दिशेने तू पुढे झुकला

अन पर्स च्या धक्क्याने माझ्या तुझा गॉगल खाली पडला

नेत्र कटाक्षाने तुझ्या मी कपाळावर हात मारला

कारण

.

.

.

.

.

.

.

.

त्यादिवशी समजले माझा रॉंग नंबर लागला.


 रजनी✍️



 

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...