प्रेमात सर्व माफ असतं
हे काही खरं नसतं
वरून तसं दाखवायचं असतं
आतून मात्र वेगळंच असतं
आपलाच मत बरोबर असतं
असं पक्क ठरलेलं असतं
समोरच्याला काहीच कळत नसतं
हेच मनात घोळत असतं
त्याच त्याच मुद्द्यावर भांडायच असतं
दोघांनी एकमेकांवर रुसायच असतं
तरीही एकत्र राहायचं असतं
हळूच मिठीत शिरायचं असतं
प्रेमाचं नंदनवन फुलवायच असतं.
.
.
.
कारण
काहीही झालं तरी प्रेम हे प्रेम असतं
अन प्रेमात सर्व माफ असतं😊😊😊
रजनी✍️

No comments:
Post a Comment