काय सांगू मंडळी
त्या दिवशी काय घडलं
त्यांनी वर्गात पाऊल टाकताच
माझं हृदय की हो चोरलं😘
त्या दिवशी सुरू झाला
नजरभेटीचा खेळ
पण भेटीचा आमच्या
बसेना ताळमेळ🙂
त्यांच्यासकट विषयात त्यांच्या
रस घेऊ लागले
अन प्रोजेक्ट असाइनमेन्ट
सर्व वेळेत होऊ लागले☺️
दिवसांनमागून दिवस लोटले
सेमिस्टर एक संपली
पण हाय हॅलोच्या पुढे
आमची गाडी नाही सरकली😡
एक दिवस हिम्मत करून
पुस्तक द्यायला गेले
अन पुस्तकाच्या मधोमध
माझे पत्र ठेवले☺️☺️
दुसऱ्यादिवशी घाबरतच
पुस्तक घ्यायल गेले
अन माझे पत्र बघून
डोकं माझं चक्रावले😡
पत्रात मी प्रेमाच्या
भावना होत्या मांडल्या
पण कर्तव्यदक्ष शिक्षकाने त्यात
शुद्धलेखनाच्या चुका काढल्या😡😏
आदर्श शिक्षकापरी त्यांनी
मूल्यमापन केले
अन पत्राला माझ्या
दहापैकी पाच मार्क दिले😡😏
झुळूक येऊन हातातील
पत्र माझे गळले
अन क्षणार्धात लक्ष
माझे पत्रामागे खिळले🙄🤔
सुंदर सुबक अक्षरात
शेरा होता लिहिलेला
सोबत लफ्फेदार
सही होती जोडीला🙄
अक्षर वळणदार पण ह्रस्व ,दीर्घ यातील
फरक काय तो ओळखा
अन करायचं असेल प्रेम
तर सध्या भाषेवर प्रेम करा😡😁😁😁😂😂
रजनी✍️

4 comments:
वाह वाह, खुपच छान…👌👌
Sundar 👌👌👌
Thank you hubby
Thank you sir
Post a Comment