Friday, 13 August 2021

सप्तरंगाची उधळण


ती वेळ छान होती
घडल्या अनेक गोष्टी
चाहुल लागता तुझी
आनंदास आली भरती
तो नवथर नऊमासाचा काळ
उदरी वाढत होतं माझ ते बाळ
उदरी जपतं होते तुला
सुंदर सुकुमार माझ्या फुला
न पाहता तुला लागला होता लळा
तव हलचालींचा मना जडला चाळा
पदस्पर्शाने तुझ्या मन आनंदले
आगमनास तव नेत्र आसुसले
आगमनाची झाली वेळ
मन झाले उतावेळ
आगमन झाले तुझे मध्यरात्री
आनंदोत्सव ते आजोबा करती
बोल बोबडे घुमले कानी
कोडकौतुक तुझे केले त्यांनी
भरून पावले ते तुझ्या येण्यानी
सार्थक झाले त्यांचे जीवनी
आजीने मग तुझे नाव सुचविले
"सार्थक " तुझे ते नामकरण झाले
खरचं ती वेळ खूप छान होती
होळीपोर्णिमेची ती तिथी होती
आगमनाने तुझ्या जीवनी आमच्या
सप्तरंगाची उधळण झाली☺️☺️❤️❤️

रजनी✍️©®

 

9 comments:

slaher said...

Nice poem aprateem...!
"aaba "

Kavyapushpa.kavi.manasi said...

खुप छान कविता...👌👍✍️🍫🌹

Urmila Parulkar " रंजू " said...

खूप छान सार्थक आणि त्याचे नावही 👌🏻👌🏻👌🏻

दुर्गा मतें "Nitya" said...

खूप छान लिहिलंय अप्रतिम

Kavyapushpa-kavi-sachinkamble said...

खूपच सुंदर लिहिलंय नाव खूप छान आहे "सार्थक"

Rajashri Jadhav kavyapushpa.kavi.rajashri@gmail.com said...

अतिशय सुंदर रचना केली मॅडम 👌👌👌

Pushpa Patel " Pushpam said...

अप्रतिम शब्दभावना... ✍️👌 सार्थक तुला उदंड आयुष्य लाभो!

मोहन सोमलकर said...

अप्रतिम सुंदर

प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " said...

अप्रतिम रचनाविष्कार मॅडम...👌👌सार्थकला खूप खूप आशीर्वाद!

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...