नवीन वर्षात जगामध्ये
आगंतुक पाहुणा आला
अन् आल्या आल्या
लोकांना संसर्ग त्याने दिला
जगात येताच शास्त्रज्ञांनी
बारसे त्याचे केले अन्
छान असे कोरोना नाव दिले
नावा सम याने मग
आपले गुण दाखविले
बाललीला दाखवत दाखवत
माणसे कैद केली अन्
वाहतूक ठप्प करत करत
त्याने शाळा बंद केली
माणूस माणसाला पारखा केला
अन् स्पर्शासही भिऊ लागला
आरोग्यव्यवस्था गडबडली
अन् अर्थव्यवस्था कोलमडली
खरं सांग ना करोना तू
जाणार आहेस कधी
सर्वांचे शिव्याशाप का
उगीच घेतोय माथी
आतातरी कोरोना तुला कळणार
आहे का काही पाहुणा म्हणून
जास्त राहणं मुळीच बर नाही
रे बाबा मुळीच बर नाही......
रजनी

5 comments:
छान...👌
😊😊😊😊🙏🙏
Khupach chan
Thank you
व्वा खुप सुंदर रचना केली.
Post a Comment