उनाड झाले मन
उनाड या वाऱ्या परी
अन् घेऊ लागले हेलकावे
गतकाळाच्या फांदीवरी
उनाड वाऱ्यासम
मन हलकं हलकं झाले
अन् उडत उडत जाऊन
आईला बिलगुन आले
उनाड वाऱ्यासम
मन खट्याळ ही झाले
अन् खट्याळपणा करीत
भावंडाना छेडून आले
उनाड वाऱ्यासम
मन सैरभैर झाले अन्
पापणीची नजर चुकवून
अश्रू गाली ओघळले
रजनी

1 comment:
उनाड वारा. सुंदर कल्पना
Post a Comment